सकाळी ८:२१ ते ९:२७ – शुक्र
दागिने खरेदी, प्रवास, कला, प्रेम, विवाहासंबंधी चर्चा, जोडीदाराचे सहकार्य, भौतिक सुख-सुविधा, घर खरेदी यासाठी अनुकूल वेळ.
सकाळी ९:२७ ते १०:३२ – बुध
व्यापार, गणित, अध्ययन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिष, मार्केटिंग, भाषण आणि संवादासाठी शुभ.
सकाळी १०:३२ ते ११:३७ – चंद्र
चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, भगवान शिवाची उपासना, प्राणायाम, छंद आणि मानसिक शांततेसाठी उत्तम.
दुपारी ११:३७ ते १२:४३ – शनि
लोखंड खरेदी, तेल, नोकर-चाकर, परिश्रम, मेहनत आणि त्यागाशी संबंधित कार्यांसाठी योग्य.
दुपारी १२:४३ ते १:४८ – गुरु
व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान आणि दानधर्मासाठी शुभ.
दुपारी १:४८ ते २:५४ – मंगळ
जमिनीचे व्यवहार, शेती, क्रीडा, न्यायालयीन कामे, वाद-विवाद, स्पर्धा आणि तांत्रिक क्षेत्रासाठी अनुकूल.
दुपारी २:५४ ते ३:५९ – सूर्य
राजकारण, सरकारी कामे, धाडस, नेतृत्व आणि वाद मिटवण्यासाठी उत्तम.
दुपारी ३:५९ ते सायंकाळी ५:०४ – शुक्र
दागिने खरेदी, प्रवास, कला, प्रेम, विवाहासंबंधी चर्चा, जोडीदाराचे सहकार्य, भौतिक सुख-सुविधा आणि घर खरेदीसाठी शुभ.
– ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक
४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर हर्षल (युरेनस), सूर्य आणि शनी यांचा विशेष प्रभाव असतो. उत्साह, ऊर्जा आणि प्रगती ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तुमचे जीवन अनेक बदल आणि नवीन घटनांनी भरलेले असते. अनपेक्षित अनुभव तुम्हाला वारंवार येतात.
तुमची विचारसरणी उच्च दर्जाची असून व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहता आणि ती प्रभावीपणे मांडण्याची क्षमता तुमच्यात असते. मात्र अनावश्यक वाद टाळल्यास गैरसमज आणि गुप्त शत्रूंपासून दूर राहता येईल.
तुम्हाला नाटक, चित्रपट आणि प्रवासाची विशेष आवड असते. तुम्ही बहुगुणी असता आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच प्रभाव व रुबाब दिसून येतो. स्वतंत्र विचारसरणीमुळे तुम्ही स्वतःचा वेगळा मार्ग निवडता.
तुम्ही परंपरागत चौकटी मोडून नवे मार्ग स्वीकारण्यास तयार असता. कठीण परिस्थितींचा धैर्याने सामना करता. जे पटत नाही त्याचा स्पष्ट विरोध करता. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि तुम्ही सतत कार्यरत राहता.
विज्ञान, साहित्य वाचन यांत तुम्हाला रस असतो. लोक तुमच्या सहवासाला पसंती देतात. धोका पत्करण्यास तुम्ही मागे हटत नाही. बुद्धिमान आणि गुणवंत लोकांच्या सहवासात राहणे तुम्हाला आवडते. जीवनात लवकर यश आणि प्रतिष्ठा मिळवण्याची तुमची इच्छा असते.
आर्थिकदृष्ट्या तुम्ही भाग्यवान असता. तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक असतो आणि इच्छाशक्ती मजबूत असते. सामाजिक व धर्मादाय कार्यात सहभाग घेण्याची आवड असते. विरुद्ध लिंगाकडून सहकार्य व लाभ मिळण्याची शक्यता असते.
तुमच्या योजना सुबद्ध असतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असते. कौटुंबिक जीवन सर्वसाधारणपणे सुखद राहते. आयुष्याच्या सुरुवातीचा काळ संघर्षमय असू शकतो आणि प्रेमसंबंधांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. आयुष्यात काही विलक्षण घटना घडू शकतात. मित्रपरिवार वेळोवेळी बदलत राहतो. तुमचा स्वभाव तार्किक आणि विश्लेषणात्मक असल्यामुळे मोठे पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असते.
यंत्रसामग्री, विज्ञान, विद्युत, वाहतूक, अभियांत्रिकी, बांधकाम, कंत्राटदारी, संशोधन, उद्योग, हस्तरेखा, ज्योतिष, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.
रविवार, सोमवार, शनिवार.
निळा, पांढरा, मॅरून.
हिरा, पोवळे (मूंगा), मोती.
(रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या जन्मकुंडलीचा विचार अवश्य करावा.)
साखरपुडा: ३, ४, ५, ८, ९, १३, १५, १६, १८, २०, २२, २३
डोहाळजेवण: १६, १७, २०, २३, २६
नामकरण: १, ३, ५, १५, १६, ३०
मुंडन: ५, ९, २६, २७, २८
गृहप्रवेश: ३, ५, ९, १५, १७, २०, २३, २८, ३०
मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण षष्ठी | ग्रीष्म ऋतू
पराभव नाम संवत्सर | शके १९४८ | संवत २०८२
दुपारी ३:०० ते ४:३०
शुभ आहे.
रेवती / रात्री ९:५४ नंतर अश्विनी
मीन / रात्री ९:५४ नंतर मेष
• चंद्र-लाभ मंगळ योग
• चंद्र-केंद्र बुध योग
मेष
रात्री ९:५४ नंतर चंद्र राशीत प्रवेश करेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील.
आर्थिक लाभ होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नियोजित कामांत यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
चंद्र-बुध केंद्र योगामुळे तुमच्या वाणीचा आणि संवादकौशल्याचा फायदा होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील.
संतानाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
घरातील वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेशी संबंधित कामांत प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.
धाडस आणि पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. लहान प्रवास लाभदायक ठरतील. महत्त्वाच्या चर्चांमध्ये यश मिळेल.
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रभावी वाणीमुळे कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक सन्मान वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक प्रगती होईल.
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. प्रवासाचे योग आहेत. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
राशीत चंद्र असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीची संधी मिळेल. चंद्र-बुध केंद्र योगामुळे बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल. रात्री ९:५४ पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
– ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक