गुरूवार, *2 एप्रिल 2026*. चैत्र पौर्णिमा
राहुकाळ - दुपारी 1:30 ते 3
आज उत्तम दिवस.*श्री हनुमान जयंती*
वैशाख स्नान आरंभ
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या.
*2* एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाशील आहात. मात्र कधी कधी स्पष्टवक्ते होतात. आणि कठोर भूमिका घेतात. इतरांच्या सूचनेप्रमाणे तुम्ही कृती करतात मात्र याचा अर्थ असा नाही की तुमचे स्वतंत्र विचार नाहीयेत. मात्र इतरांच्या विचारांची आणि कर्तृत्वाचे तुम्ही कदर करतात. योग्य काय आणि अयोग्य काय याची तुम्हाला सहज जाण होऊ शकते. तुम्ही एखादे ध्येय मनावर घेतात आणि ते पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत. प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला घाई असते आणि तुमचे विचार कृतीत उतरवण्याचा तुम्ही उतावळेपणा करतात. एखादी तुमची स्वतःची चूक तुमच्या लक्षात आले तरी ते मान्य करणे तुम्हाला जमत नाही. तुमच्यात अहंकार असू शकतो. दुर्बल लोकांना तुम्ही मदत करतात. तुमच्यात नैतिक धैर्य असते. मित्रा बद्दल तुम्हाला प्रेम असते. आणि तुम्ही नेहमी त्याची बाजू घेत असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. दूरच्या प्रवासाचे तुम्हाला आवड असते. इतरांना तुम्ही सहज आकर्षून घेतात. तुमच्या अंगात उत्साहाच्या आणि नवनवीन कल्पना तुम्हाला सुचत असतात. वयाने ज्येष्ठ असलेल्या लोकांकडे तुमचा ओढा असतो. वय वर्ष 30 नंतर तुमचा भाग्योदय होतो. वयाच्या चाळिशीनंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारते. प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही अधिक खर्च करतात. आर्थिक परिस्थिती समाधानकारक असते.
तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा ,घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यांचा इतरांना मत्सर वाटतो .तीव्र इच्छाशक्ती असून नेट नेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असतात. घरातील सजावट उत्तम रीतीने करून घेता. वैभवशाली जीवनाकडे ओढा असतो. बाग बगीचा व प्राणी व जनावरांची आवड असते. तुमच्यात लहरीपणा आहे. तुम्ही प्रतिष्ठेला जपता.विनोदी स्वभाव आणि संभाषण कौशल्या असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- किरमिजी. पांढरा निळा
शुभ रत्ने: मोती,पोवळे ,हिरा
(रत्ने घेताना कुंडलीचा आधार घ्यावा)
*आजचे राशिभविष्य*
मेष
मैत्रीणींनो आज
आज तुम्ही कामात काटेकोर पण आणण्याचा प्रयत्न कराल. पण जास्त घाई केल्यास चूक होऊ शकते
मनात थोडा ताण येईल.
शांतपणे काम करा.
वृषभ
मैत्रीणींनो आज
प्रेम, आनंद, सर्जनशीलता वाढेल.
पती कडून अपेक्षा वाढतील.
जास्त अपेक्षा ठेवू नका.
मिथुन
मैत्रीणींनो आज
घर आणि काम दोन्ही सांभाळताना समतोल राखावा लागेल.
घरात छोट्या गोष्टींवर लक्ष जाईल.पण काटेकोर पणा चा आग्रह नको.
कर्क
मैत्रीणींनो आज
संवादातून काम साध्य कराल.
तुमचं बोलणं प्रभावी ठरेल.
मृदू भाष्य ठेवा.
सिंह
मैत्रीणींनो आज
पैशांबाबत विचार वाढेल
खर्च आणि बचत यावर लक्ष ठेवा.
व्यर्थ खर्च टाळा
कन्या
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व उठून दिसेल
आत्मविश्वास + कामात अचूकता राहील.
पण जास्त दगदग नको.
तुळ
मैत्रीणींनो आज
मन अंतर्मुख राहील. एकटं राहावंसं वाटेल
ध्यानधारणा करा., शांत वेळ घ्या
वृश्चिक
मैत्रीणींनो आज
मित्रमैत्रिणींकडून मदत मिळेल.सोशल नेटवर्किंग मधून लाभ घडेल.
मात्र योग्य लोक निवडा.
धनू
मैत्रीणींनो आज
कामात जबाबदारी वाढेल
वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील.
संयम ठेवा.
मकर
मैत्रीणींनो आज
नवीन शिकण्याची संधी येईल.
प्रवास किंवा शिक्षण यात यश.
मन खुलं ठेवा
कुंभ
मैत्रीणींनो आज
भावनिक गोंधळ राहील.
नात्यात समस्या येऊ शकतात.
स्पष्ट बोला.
मीन
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधावर फोकस
जोडीदाराशी हितगुज करा.
वागणे समतोल ठेवा.
आजचा विशेष उपाय (महिलांसाठी)
संध्याकाळी तुपाचा दिवा लावा
“ॐ नमो भगवते वासुदेवाय” ११ वेळा जप
श्री मारुती स्तोत्र म्हणा.
*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाईल 9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
*सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.