असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य  ७ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य  ७ जून
  • Positive News
  • जून 7 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य  ७ जून

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-

शनिवार, ७ जून २०२५. ज्येष्ठ शुक्ल द्वादशी. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

आज वृद्धी तिथी आहे. भागवत एकादशी एकादशी व्रताचे फलप्राप्ती करिता सोने, साखर व जलकुंभ दान करणे.

चंद्रनक्षत्र - चित्रा/स्वाती.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण गुरू आणि चंद्र प्रतियुती शुक्र आहे. अनुकूल ग्रहमान आहे. आज फायद्याचे करार होतील. मन आनंदी राहील. प्रणयरम्य दिवस आहे.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. गुंतवणूक/लॉटरी यात नशीब अजमावून बघा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आध्यत्मिक लाभ होतील. दान धर्म कराल. मन आनंदी राहील. मार्ग सापडतील. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मनासारखी कामे पार पडतील. अनुकूल चंद्र गुरू योग स्वप्ने साकार करतील. नोकरीच्या ठिकाणी महिलांकडून उत्तम सहकार्य लाभेल. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. श्री. हनुमानाची कृपा राहील. वाहन सुख लाभेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  चंद्राशी गुरूचा शुभ योग आहे. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. वाहन सुख लाभेल. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. स्वतःच्या चैनीवर खर्च कराल. हातून अधार्मिक कृत्ये घडू नये याची काळजी घ्या.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र अनुकूल आहे. महिलांकडून लाभ होतील. जोडीदाराची नाराजी कमी होईल. शत्रू माघार घेतील.
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी आज विशेष उपक्रम राबवाल. त्यातून आनंद मिळेल. देवदर्शन घडेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल चंद्र आहे. कामाचा वेग वाढेल. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. आज चंद्र, बुध आणि गुरू अनुकूल आहेत. प्रवास घडतील.  
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. हातून चांगली कामे होतील. ओळखीच्या महिलांचे गैरसमज होऊ शकतात. काळजी घ्या.

-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

७ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर नेपच्यून, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळेत तुम्ही स्वतःला बलवान आणि कमकुवत समजतात.  अंगात भित्रेपणा असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे आणि त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. तुमच्या महत्वाकांक्षा अतिशय वरच्या पातळीचे असतात. तुम्हाला परंपरा फारशा आवडत नाहीत. क्रीडा, भ्रमंती, प्रवास, गिर्यारोहण याचे तुम्हाला आवड असते. इतरांना स्वतःचे विचार तुम्ही उत्तम पणे समजावून सांगतात. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते आणि तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाचे संबंध येतो. तुम्ही तुमच्या पेक्षा वरिष्ठ वर्तुळात वावरतात. सर्वसामान्य माणसाबद्दल तुम्हाला फारशी आवड नसते. आवडते पुस्तक वाचण्यात तुमचा बराच वेळ जातो. तुम्हाला स्वतःच्या कर्तव्यांची आणि अधिकाराची जाणीव आहे. तुमचा स्वभाव थोडा संशयी आहे. तुम्हाला अहंकार असतो. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन मात्र विशाल आहे. तुमच्यात व्यापारी वृत्ती आहे. तुमच्या वागण्यात मुक्तपणा असतो. मात्र इतरांना तुमच्यापासून स्फूर्ती मिळते.

व्यवसाय:-  दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, आयात-निर्यात, वैद्यकीय क्षेत्र, गणित.

शुभ दिवस:- सोमवार, बुधवार, गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा.

शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, इंद्रनील, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या