असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ५ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या बाळाची तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्य:-
५ जून २०२५. ज्येष्ठ शुक्ल दशमी, ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र - हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा सूर्याशी शुभ योग आहे. व्यवसायात वाढ होईल. स्पर्धेत यश मिळेल. मन आनंदी राहील. कायदेशीर कामे आज पूर्ण करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. लॉटरी लागू शकते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) विनाकारण कायदाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आध्यत्मिक लाभ होतील. वक्तृत्व चमकेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मनासारखी कामे पार पडतील. नात्यातून मदत मिळेल. अनुकूल रवी आरोग्य आणि मान सन्मान देईन.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी दूर होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. मौल्यवान खरेदी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यय स्थानी चंद्र आहे. रोजच्या कामात लक्ष द्यावे हे उत्तम. सुखद अनुभव येतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. आज सगळी रखडलेली कामे पूर्ण करा. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. कौतुक होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत /व्यवसायात प्रगती होईल. स्पष्ट भूमिका घ्याल. कामानिमित्त भ्रमंती होईल. मात्र याचे चांगले फळ मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमान आहे. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थनी चंद्र आहे. फारशी अनुकुलता नाही. संतती साठी मोठी खरेदी करावी लागू शकते.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मन आनंदी राहील. हातून चांगली कामे होतील. कलाकारांना मोठे यश मिळेल.
-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
५ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान आहात, चिकित्सक आणि संशोधन करणारे आहात. तुमच्यात व्यापारी वृत्ती असून तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमच्यामध्ये धूर्तपणा देखील आहे. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. आणि त्याचा तुम्ही व्यवहारात वापर करतात. तुम्ही मनाने उदार आहात. इतरांचा सन्मान करतात. तुम्ही कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. स्वतःचे विचार तुम्ही इतरांना समजून सांगू शकतात. आपलं उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला पक्कं माहीत असतं. तुम्ही उच्च दर्जाच्या वस्तू वापरतात. यात वाहन, दागिने, सुगंधी द्रव्य यांचा समावेश आहे. तुम्हाला समाजात मिसळणे आवडते. तुम्ही विविध समारंभांमध्ये हौसेने भाग घेतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल आहे. तुम्हाला धर्म, आणि तत्त्वज्ञान याची आवड आहे. प्रवास करणे तुम्हाला आवडते.
व्यवसाय:- बँकिंग, मेडिकल, प्रयोगशाळा उपकरणे, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, क्रीडा, वकील, शाब्दिक खल करणाऱ्या व्यवसाय, कारखाना, गृह सजावट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521