असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ४ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज वाढदिवस असलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-
बुधवार, ४ जून २०२५, ज्येष्ठ शुक्ल नवमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण,विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज उत्तम दिवस आहे"
नक्षत्र - उत्तरा (फाल्गुना)आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह/ कन्या. (वज्र योग् शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षल शी शुभयोग आहे. मात्र गुरू, शनी, नेपच्यून शी अशुभ योग आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र प्रतिष्ठा पणास लागेल. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खरेदी होईल. आनंदी राहाल. गुंतवणुकीतून यश मिळेल. मात्र मोठे निर्णय आज नकोत.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर भूमिका घ्याल. प्रवासात त्रास होऊ शकतात. गृह कलह टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक फायदा होईल. व्यापारात वृद्धी होईल. मात्र जमीन व्यवहारातून नुकसान संभवते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही. नेतृत्व गुण चमकतील. व्यसने कटाक्षाने टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. सुखे मिळतील. वारसा हक्काचं संपत्तीचे वाद होऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मात्र तुमची एखादी चूक देखील भविष्यात रौद्र रूप धारण करू शकते. संध्याकाळ मित्र मंडळी सोबत व्यतीत होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. लाभ स्थानी चंद्र आहे. प्रसन्न राहाल. मानसिकता चांगली राहील. शत्रूंकडून मैत्रीत्वचा प्रस्ताव येईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव येतील. वृद्धी होईल. सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. तरीही कोणाच्याही बहकाव्यात येऊ नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. नाईलाजाने प्रवास करावा लागेल. अनामिक भय दाटून येईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संथपणा जाणवेल. अंगात आळस असणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. संतती साठी खर्च करा लागेल. दानधर्म करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. भलत्या माणसावर विश्वास ठेवू नका.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, शुक्र आणि बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. अनेकदा तुमच्या वागण्यात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला अनेक विलक्षण आणि अनपेक्षित घटनांचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे, तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती आणि तल्लख पण आहे. तुमची विचारसरणी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे. तुमच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. हातात घेतलेल्या कार्यात तुम्ही पूर्वनियोजन करून उत्तम यश मिळवतात. तुम्हाला नाविन्याची आणि प्रवासाची आवड आहे. रूढी, परंपरा तुम्हाला फारसे आवडत नाहीत. आपल्या आयुष्यात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटत राहते त्यामुळे तुमचे घर, नोकरी आणि मित्रपरिवार देखील बदलत राहतो. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. तुमच्या वागण्या मध्ये एक ठामपणा आहे. तुम्हाला तुमच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात.
व्यवसाय:- जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, बँकिंग, आयात-निर्यात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कान नाक डोळे तज्ञ, संशोधन.
शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, रविवार.
शुभ रंग:- जांभळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521