असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १७ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १७ जून
  • Positive News
  • जून 17 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १७ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-

मंगळवार, १७ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण षष्ठी/सप्तमी. शके १९४७, संवत २०८१. विश्वासूनाम संवत्सर. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 

"आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे"  

नक्षत्र - शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. (बाळाची विष्टी करण शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण बुध तर लाभ शुक्र आहे. लाभ स्थानी चंद्र आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. मन आनंदी आणि प्रणय उत्सुक राहील. वाहन सुख मिळेल. पाळीव पशूंचा लळा लागेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीत चांगले अनुभव येतील. अधिकारात वाढ होईल. वक्तृत्व चमकेल. लेखकांना चांगल्या संधी मिळतील.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल चंद्र शुक्र योग तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल. प्रवास घडतील. कामे पूर्ण होतील. सिद्धी प्राप्त होतील. शब्दाला मान मिळेल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. सांभाळून पावले उचला. जुने येणे वसूल होईल.  धन- संपत्ती वाढेल. नवीन करार होतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पैसे येणे वसूल होतील. शत्रू पराभूत होतील. भागिदारी व्यवसायातून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. व्यापार वाढेल. नवीन संधी चालून येतील. बुद्धिमत्ताचा चांगला उपयोग होईल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सिद्धी प्राप्त होतील. छोटे प्रवास घडतील. संशोधन कार्यात यश मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चतुर्थ चंद्र सामाजिक कामात अडकवून ठेवेल. जमीन व्यवहार पुढे जातील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. अर्थकारण मजबूत होईल. व्यापारात वृद्धी होईल. पत्नीच्या घरून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक सौख्य लाभेल. नविन खरेदी होईल. देणी द्याल. कायद्याशी संबंध येईल. महिलांकडून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. नातेवाईक येतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. कलाकारांना यश लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका.  विनाकारण अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. छोटे प्रवास घडतील.

१७ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे ध्येय आणि महत्वाकांक्षा उच्च प्रतीच्या आहेत. तुम्हाला परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमचे विचार बंडखोर मात्र क्रियाशील आणि विधायक आहेत. तुम्ही उत्कृष्ट संघटक आहात. हिप्नॉटिझमची आवड असते. संशोधन, ज्ञान, सखोल अभ्यास याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही फार भावनाशील नसतात. तुमच्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी उशीराने घडतात. शिस्त, गांभीर्य, कर्तव्य याची जाणीव तुम्हाला प्रामुख्याने असते. तुम्ही सखोल विचार करणारे आणि स्थिर मनाचे आहात. तुम्ही समतोल वृत्तीने सर्वत्र बघतात. कोणत्याही प्रश्नांची  दुसरी बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याबद्दल इतर लोकांचे बरेच गैरसमज असतात. तुम्ही तुमच्या कामामध्ये सतत मग्न असतात. तुम्ही धोरणी आणि चतुर आहात. निसर्ग, संगीत, सौंदर्य यांची तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या अधिकारांची तुम्हाला जाणीव असते. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही उत्तम व्यवस्थापन करू शकतात. तुम्ही न्याय प्रेमी, कायदा प्रेमी आहात. तुमचे आर्थिक नियोजन काटेकोर असते. तुम्ही इतरांना योग्य वेळी मदत करतात. तुम्ही दीर्घोद्योगी आहात आणि तुम्हाला आयुष्यात उशिरा यश मिळते मात्र ते बराच काळ टिकते.

व्यवसाय:-  सर्वप्रकारची शास्त्र, स्टॅटिस्टिक्स, अवघड गणित, संशोधन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, अकाउंट, पॅथॉलॉजी, वकील.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- गडद निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.

शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू, काळा मोती. अमेथिस्ट, लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या