असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 5 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५
 

कार्तिक शुक्ल द्वादशी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
 चंद्र – मेष राशीत, अश्विनी आणि भरणी नक्षत्रात. (विष्टी करण शांती)
आज वर्ज्य दिवस आहे. त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुनानक जयंती

 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०

 मेष: आर्थिक व्यवहारात लाभ. कामातील नियोजन फलदायी ठरेल. घरातील वातावरण आनंदी. नातेवाईकांशी संवाद वाढेल.

 वृषभ: चंद्र तुमच्या व्यय स्थानी असल्याने आजचा दिवस विशेष नाही. मात्र आत्मविश्वास वाढेल, महत्त्वाचे निर्णय आज नकोत. प्रतिष्ठा आणि मान मिळेल. मात्र संयम आवश्यक आहे.

 मिथुन: आज खर्चिक दिवस. आरोग्यविषयक काळजी आवश्यक. लवकर रागावू नका. ध्यान किंवा विश्रांती उपयोगी ठरेल.

 कर्क: मित्रांचा सहवास लाभदायक. नवीन ओळखी निर्माण होतील. कामात गती येईल. संध्याकाळी शुभ वार्ता मिळेल.

 सिंह: करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. वरिष्ठांकडून प्रशंसा. समाजात सन्मान मिळेल. महत्वाचे कार्य पूर्ण होईल.

 कन्या: भाग्यवृद्धीचा दिवस. प्रवास फलदायी ठरेल. नवीन शिक्षण किंवा प्रशिक्षणास सुरुवात करण्यासाठी अनुकूल काळ.

 तूळ: भावनिक स्थैर्य आवश्यक. अनावश्यक खर्च टाळा. दुपारनंतर आर्थिक सुधारणा. ध्यान आणि संगीत उपयुक्त ठरेल.

 वृश्चिक: दांपत्य जीवनात सौहार्द वाढेल. भागीदारीतून लाभ. समाजात नाव मिळेल. प्रवास किंवा करारासाठी योग्य दिवस.

 धनु: कामाचा व्याप वाढेल. परिश्रमाचे फळ मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. आहारात शिस्त ठेवा.

 मकर: विद्यार्थ्यांसाठी व प्रेमसंबंधांसाठी शुभ काळ. सर्जनशील कल्पनांना वाव मिळेल. संध्याकाळी आनंदाचे क्षण.

 कुंभ: घरगुती विषयांवर लक्ष द्या. स्थावर मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मातृसंबंध दृढ होतील.

 मीन: प्रवास योग शुभ. संवादातून लाभ. मित्र व सहकाऱ्यांचा सहकार्य लाभेल. नवीन कार्याची सुरुवात यशस्वी.

 आजचा शुभ रंग: हिरवा
 आजचा मंत्र: “ॐ ह्रीं श्रीं क्लीं नमः”

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
 

संबंधित बातम्या