असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, २० जानेवारी २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, २० जानेवारी २०२६
  • Positive News
  • जानेवारी 20 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, २० जानेवारी २०२६
माघ शुक्ल द्वितीया
शके १९४७, संवत २०८२
शिशिर ऋतू – उत्तरायण
विश्वावसुनाम संवत्सर

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज उत्तम दिवस आहे”

चंद्रनक्षत्र – श्रवण / (दुपारी १.०७ नंतर) धनिष्ठा
चंद्र राशी – मकर

आजचे ग्रहयोग :

 मंगल लाभ शनी – कष्टाचे फळ, स्थैर्य, शिस्त
 मंगल त्रिकोण हर्षल – धाडसी निर्णय, नवे प्रयोग
 बुध लाभ नेपच्यून – कल्पकता, अंतर्ज्ञान, सर्जनशीलता
 शनी लाभ हर्षल – दीर्घकालीन बदल, प्रगतीची दिशा

आजचे राशिभविष्य

मेष

(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामात गती येईल. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ

(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबातील प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. वाहन किंवा घरासंबंधी चर्चा यशस्वी ठरतील.

मिथुन

(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवाद कौशल्यामुळे लाभ होईल. लेखन, शिक्षण, व्यवसायात प्रगती. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क

(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भावनिक स्थैर्य मिळेल. आर्थिक नियोजन चांगले करता येईल. कुटुंबाचा आधार लाभेल.

सिंह

(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
मान-सन्मान वाढेल. नेतृत्वगुण दिसून येतील. आत्मविश्वास योग्य दिशेने वापरा.

कन्या

(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नियोजनबद्ध कामात यश मिळेल. आरोग्य सुधारेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

तुळ

(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहार अनुकूल. मात्र निर्णय घेताना घाई टाळा.

वृश्चिक

(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. मित्रांकडून सहकार्य. गुप्त योजना यशस्वी ठरतील.

धनु

(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
कामाच्या ठिकाणी प्रगती. जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून लाभ होईल. संयम ठेवा.

मकर

(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
चंद्र तुमच्याच राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस. स्थैर्य व यश मिळेल.

कुंभ

(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
दीर्घकालीन योजना आखण्यासाठी चांगला दिवस. तांत्रिक व सर्जनशील कामात लाभ.

मीन

(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
मानसिक समाधान मिळेल. अध्यात्मिक किंवा सर्जनशील कार्यात रस वाढेल. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल.

शुभ रंग : निळा, करडा
शुभ अंक : ४, ८

— सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 8087520521

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, पती-पत्नी गुण, स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.
कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा.

संबंधित बातम्या