असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६.
  • Positive News
  • ऑगस्ट 6 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६.

*शुभ कालावधी*

सकाळी ८.२१ ते सकाळी ९.२६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.

सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.

सकाळी १०.३० ते सकाळी ११.३५ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  
 
सकाळी ११.३५ ते दुपारी १२.४० - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 

दुपारी १२.४० ते दुपारी १.४५ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.

दुपारी १.४५ ते दुपारी २.५० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.

दुपारी २.५० ते दुपारी ३.४५ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.

दुपारी ३.४५ ते संध्याकाळी ४.५९ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त

साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.

डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६

बारसे - १,३,५,१५,१६,३०

जावळ - ५,९,२६,२७,२८.  

गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
[03/08, 1:54 pm] Mangesh Panchakshari: ६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शुक्र रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ आहात तसेच कलाकार आणि कला प्रिय देखील आहात. तुमच्या वागण्यात, बोलण्यात एक प्रकारचा आकर्षकपणा आणि मोहक पण आहे. इतरांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळा असून इतरांना त्या लवकर समजत नाहीत. तुमची वृत्ती खर्चिक आहे. तुमचे आयुष्य आरामदायक, श्रीमंत, आनंदात जाते. इतरांच्या आदरास तुम्ही पात्र असतात. तुमचे मन विशाल आहे. व्यवसायामध्ये तुम्ही उच्च पदावर जातात. सिनेमा नाटक यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्हाला जर मान सन्मान मिळाला तर तुम्ही खुश होतात आणि अधिक चांगले नेतृत्व करतात. इतरांनी कौतुक 'न' केल्यास तुमचा विरस होतो. तुम्ही अत्यंत अभ्यासू वृत्तीचे आहात. वृत्तीने तुम्ही गंभीर असतात आणि तुमचा मित्रपरिवार फार जास्त नसतो. आयुष्यात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. तुम्ही उत्साही आणि महत्त्वाकांक्षा असून तुमच्या कामात सातत्य आहे. अहंगंड आणि इतरांवर स्वतःची मते लादणे टाळावे.  

व्यवसाय:-  गृह सजावट. दागिने विक्री, संगीतज्ञ, हॉटेल मॅनेजर, मिठाईचा व्यवसाय, जमीन खरेदी विक्री, तयार कपडे, कॉस्मेटिक्स, सुवासिक अत्तरे.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- निळा, गुलाबी.

शुभ रत्न:- पाचू, मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण अष्टमी / संध्याकाळी ६.५३ नंतर नवमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००

"आजचा दिवस चांगला असून महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे."

नक्षत्र - भरणी / रात्री ८.१४ नंतर कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.

रवी केंद्र चंद्र.
चंद्र लाभ बुध.

टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढेल. नवीन कामांना चांगली सुरुवात होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.

वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. दैनंदिन कामे सुरळीत पूर्ण होतील.

मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र-बुधाच्या शुभ प्रभावामुळे संवादकौशल्याचा लाभ होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल.

कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची साथ लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल.

कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
विचारपूर्वक घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरगुती कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासाचा योग संभवतो. आर्थिक लाभ मिळेल.

वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी ठरतील.

मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामात अपेक्षित यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संयमाने काम केल्यास लाभ मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. मानसिक शांतता लाभेल.

मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. दिवस समाधानकारक जाईल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

संबंधित बातम्या