असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, ९ नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, ९ नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 9 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, ९ नोव्हेंबर २०२५

 कार्तिक कृष्ण पंचमी  विश्वावसुनाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८१
 चंद्र – मिथुन राशीत 
 नक्षत्र – आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्र. आज चांगला दिवस आहे.
 
 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००

 मेष (Aries)

आज दिवस थोडा धावपळीचा राहील, पण प्रयत्नांमुळे लाभ निश्चित. वाहन वापरताना सावधगिरी आवश्यक. संध्याकाळी शुभ बातमी मिळेल.
 उपाय: सूर्याला अर्घ्य द्या आणि रामनामाचा जप करा.

 वृषभ (Taurus)

व्यवसायिक क्षेत्रात अनुकूल बदल दिसतील. घरातील वातावरण शांत राहील. काही नवे संबंध जुळतील.
 उपाय: देवी पार्वतीला दुग्धाभिषेक करा.

 मिथुन (Gemini)

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे मानसिक अस्थिरता संभवते. संभाषणात संयम ठेवा. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या.
 उपाय: विष्णु सहस्रनाम पठण करा.

 कर्क (Cancer)

व्यय स्थानी चंद्र असल्याने खर्च वाढतील. मन उदास राहू शकते. आज वादविवाद टाळा.
 उपाय: चंद्राला पाण्याचा अर्घ्य द्या.

 सिंह (Leo)

धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दुपारनंतर मानसिक शांतता मिळेल. खर्चात वाढ पण समाधानकारक दिवस.
 उपाय: सूर्य व विष्णूची संयुक्त पूजा करा.

 कन्या (Virgo)

आर्थिक लाभाचे संकेत. जुने प्रश्न मिटतील. कार्यालयीन कामात वरिष्ठांकडून मदत मिळेल.
 उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा.

 तुला (Libra)

नोकरीत बदलाचे योग. जोडीदाराशी संवाद सुधारेल. मित्रांकडून लाभ. आरोग्य सुधारेल.
 उपाय: देवी लक्ष्मीला कमळफूल अर्पण करा.

 वृश्चिक (Scorpio)

व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. परिश्रमाचे फळ लाभेल. घरगुती जबाबदारी वाढेल.
 उपाय:  हनुमानाला तेल अर्पण करा.

 धनु (Sagittarius)

नवीन कल्पना सुचतील. परदेशाशी संबंधित कार्यात यश. धार्मिक भाव वाढेल.
 उपाय: पिवळे वस्त्र धारण करा.

 मकर (Capricorn)

आर्थिक अडचणी दूर होतील. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचे योग लाभदायी.
 उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.

 कुंभ (Aquarius)

आज चंद्रबल मध्यम. काही निर्णय पुढे ढकला. संध्याकाळी मित्रांमुळे आनंद मिळेल.
 उपाय: तुलसीवृंदावनाला प्रदक्षिणा घाला.

 मीन (Pisces)

मानसिक समाधान मिळेल. आरोग्य उत्तम. धार्मिक कार्यात यश. दानधर्मासाठी योग्य दिवस.
 उपाय: भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.

 आजचा शुभ विचार:
“शांतता आणि श्रद्धा — हेच मनाच्या सामर्थ्याचे दोन सर्वोच्च आधार आहेत.”
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
 

संबंधित बातम्या