असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, २ नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, २ नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 2 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य रविवार, २ नोव्हेंबर २०२५

 कार्तिक शुक्ल एकादशी/द्वादशी. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
 चंद्र – कुंभ आणि मीन राशीत, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा नक्षत्रात.  (व्याघात योग आणि विष्टी करणं शांती)

 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००

आज क्षय तिथी आहे. भागवत एकादशी, तुलसी विवाह प्रारंभ, पंढरपूर यात्रा, चातुर्मास समाप्ती

 मेष: दिवस आनंददायी. कामात प्रगतीचे संकेत. कौटुंबिक आनंद वाढेल. सर्जनशील कल्पनांना वाव मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

 वृषभ: आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक विषयांवर संयम आवश्यक. संध्याकाळी मनःशांती मिळेल.

 मिथुन: आज नातेसंबंध दृढ होतील. मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. कामात गती येईल.

 कर्क: व्यावसायिक क्षेत्रात नवे यश. वरिष्ठांकडून प्रशंसा. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम घडू शकतो. आरोग्य चांगले.

 सिंह: प्रवास योग उत्तम. नवे ज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल.

 कन्या: आर्थिक स्थितीत सुधारणा. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील. भावंडांशी संबंध सुधारतील. मात्र आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.

 तूळ: सकाळी पंचम चंद्र असल्याने दिवस अत्यंत शुभ. कामात यश, प्रवास लाभदायक, दैव अनुकूल. सुदैव चमकेल.

 वृश्चिक: काही मानसिक ताण जाणवू शकतो. गुप्त शत्रूं पासून सावध राहा. संयम ठेवा. ध्यान व विश्रांती उपयुक्त ठरेल.

 धनु: भागीदारीतून लाभ. दांपत्य जीवनात आनंद वाढेल. नवीन लोकांशी संपर्क लाभदायक ठरेल. आर्थिक वाढ संभवते.

 मकर: आज कामाचा व्याप जास्त. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल.

 कुंभ: प्रेमसंबंधात आनंददायक घडामोडी. मुलांशी संवाद वाढेल. सर्जनशीलतेसाठी योग्य काळ. मनोरंजनाचा आनंद घ्याल.

 मीन: घरगुती विषयांवर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थैर्य राहील.

 आजचा शुभ रंग: पांढरा
 आजचा मंत्र: “ॐ नमः शिवाय”

 विशेष टीप: चंद्र उत्तराभाद्रपदा नक्षत्रात असल्याने आध्यात्मिक विचारांना चालना मिळेल; ध्यान, पूजा व दानासाठी अतिशय अनुकूल दिवस.

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
 

संबंधित बातम्या