असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १० नोव्हेंबर २०२५

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १० नोव्हेंबर २०२५
  • Positive News
  • नोव्हेंबर 10 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १० नोव्हेंबर २०२५
 

कार्तिक कृष्ण षष्ठी  विश्वावसुनाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८१
चंद्र – मिथुन आणि कर्क राशीत. आज उत्तम दिवस आहे.
नक्षत्र – पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.००

 मेष (Aries)

चंद्र कर्क राशीत असल्याने भावनिकतेचा प्रभाव राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण प्रेमळ वातावरण राहील. घरगुती कामात यश.
 उपाय: सोमवारी शिवलिंगावर दूध व जल अर्पण करा.

 वृषभ (Taurus)

व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहाय्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वाहन खरेदीचे योग.
 उपाय: पार्वती मातेची पूजा करा व चांदी धारण करा.

 मिथुन (Gemini)

कुटुंबीयांमधील संवाद सुधारेल. खर्च वाढेल पण समाधान लाभेल. आत्मविश्वासाने काम करा.
 उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.

 कर्क (Cancer)

चंद्र दुपारी तुमच्या राशीत येत असल्यामुळे दिवस उत्तम. कामात प्रगती होईल, आत्मविश्वास वाढेल. प्रवास लाभदायक.
 उपाय: चंद्राला कच्चे दूध अर्पण करा.

 सिंह (Leo)

शांतता राखा. थकवा जाणवेल. अनावश्यक वाद टाळा. संध्याकाळी चांगली बातमी मिळू शकते.
 उपाय: सूर्य व शिव दोघांची संयुक्त पूजा करा.

 कन्या (Virgo)

आर्थिक लाभाचे योग. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी. कार्यक्षेत्रात नवी ओळख होईल.
 उपाय: श्रीविष्णूला पिवळे फुल अर्पण करा.

 तुला (Libra)

वरिष्ठांकडून कौतुक. सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. घरात शुभ प्रसंग.
 उपाय: लक्ष्मीपूजन करा आणि चांदीत जल ठेवा.

 वृश्चिक (Scorpio)

धनप्राप्तीचा योग. जुनी देणी मिळतील. प्रवास लाभदायक. आरोग्य सुधारेल.
 उपाय: हनुमानाला सिंदूर व केळी अर्पण करा.

 धनु (Sagittarius)

धार्मिक कार्यासाठी योग्य दिवस. मन शांत व स्थिर राहील. सन्मान व यश मिळेल.
 उपाय: पिवळ्या कपड्यांत विष्णू पूजन करा.

 मकर (Capricorn)

नोकरीत परिश्रम वाढतील, पण फळ मिळेल. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. संध्याकाळी विश्रांती घ्या.

 उपाय: शनिदेवाला काळे तीळ व तेल अर्पण करा.

 कुंभ (Aquarius)

नवीन संधी मिळतील. जोडीदाराचा आधार लाभेल. सामाजिक मान वाढेल.
 उपाय: शिवलिंगावर पांढरे पुष्प अर्पण करा.

 मीन (Pisces)

धार्मिक भावना जागृत होतील. प्रवास यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांना उत्तम यश.
 उपाय: भगवान विष्णूला खीर अर्पण करा.

 आजचा शुभ विचार:
“जिथे श्रद्धा आणि संयम असतो, तिथे सर्व संकटे लहान भासतात.”
-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.
 

संबंधित बातम्या