असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १८ मे
रविवार, १८ मे २०२५. वैशाख कृष्ण षष्ठी. शके १९४७, संवत २०८१. वसंत/ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज वृद्धीतिथी आहे"
नक्षत्र - उ. षा./(संध्याकाळी ६.५३ नंतर) श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी त्रिकोण चंद्र, चंद्र लाभ शनी आहे. विक्री व्यवसायात यश मिळेल. मान सन्मान मिळतील. सरकारी योजनेचे लाभ मिळतील. अध्यात्मिक लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास घडतील. वाहन सुख लाभेल. अनपेक्षित लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. अधिकार वाढतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. सांभाळून पावले टाका. चैनीवर खर्च कराल. प्रतिष्ठा पणास लागेल. कौतुक होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. सन्मान होतील. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) षष्ठ स्थानात चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. व्यवसायात यश मिळेल. सन्मान मिळतील. श्री. हनुमान आणि श्री शनैश्वर उपासना करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रू माघार घेतील. मार्ग सापडेल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ व्यतीत कराल. सहल घडेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात व्यस्त व्हाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन खरेदी होईल. अनुकूल शनी उत्तम धनलाभ देतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्र उत्तम अर्थ लाभ मिळवून देतील. व्यावसायिक यश लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अडचणीतून मार्ग सापडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. स्थावर संपत्ती वाढेल. शेतीची कामे मार्गी लागतील. परिस्थिती आटोक्यात येईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळेल. नात्यातून शुभ समाचार समजतील. अचानक लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाचे करार आज नकोत. चौथा रवी मानसिक सुख देईन. खर्च वाढले तरी त्यातून आनंद मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल चंद्र आहे. मौज कराल. प्रवास घडतील. मनासारखा दिवस व्यतीत होईल. सुटीचा आनंद घ्याल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.