असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १६ मे
शुक्रवार, १६ मे २०२५. वैशाख कृष्ण चतुर्थी. विश्ववसुनाम संवत्सर. शके १९४७. संवत २०८१. वसंत/ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज उत्तम दिवस आहे" संकष्टी चतुर्थी चंद्रोदय (मुंबई - रात्री १०.२८, नाशिक रात्री १०.२७)
चंद्रनक्षत्र - मूळ/(दुपारी ४.०८ नंतर) पू षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण बुध आणि चंद्र केंद्र शुक्र आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. मार्ग सापडेल. वाहन सुख लाभेल. भौतुक सुखासाठी खर्च कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. तुम्ही विशाल हृदयाचे आहात. मिश्किल स्वभाव आणि सौंदर्य दृष्टी हे तुमचे गुण आहेत. आज बौध्दिक संपदा कामास येईल. चैनीवर खर्च कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रिय व्यक्तीची भेट होईल. आवडत्या ठिकाणी प्रवास घडतील. योग्य संवाद साधल्यास आर्थिक लाभ होतील. महिलांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यवसाय वाढेल. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते. नवीन वस्तू खरेदी होईल. संगणक, भ्रमण ध्वनी यासारख्या उपकरणातून लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अचानक लाभ होतील. शेअर्स मध्ये अचूक अंदाज येतील. उपासना फळास येईल. दळणवळण क्षेत्रातून फायदा होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पशु प्रेम वाढेल. शेतीतून लाभ होतील. कायदेशीर बाबतीत सजग रहा. दबदबा वाढेल. मात्र मत्सर त्रास जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उद्योग/व्यवसाय वाढेल. आर्थिक प्रगती होईल. धनलाभ होईल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) बऱ्यापैकी अनुकूल दिवस आहे. अधिकाराचा लाभ मिळेल. सन्मान होईल. मात्र मन अस्वस्थ करणाऱ्या घटना घडू शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन आनंदी राहील. नावलौकिक वाढेल. तुमच्या सध्याच्या अधिकाराचा तुम्हाला लाभ मिळेल. वाहन जपून चालवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. भ्रमंती घडेल. बाराव्या स्थानात चंद्र आहे. अपेक्षाभंगाचे दुःख पदरात येऊ शकते. आज मोठी जोखीम घेऊ नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल चंद्र वाटचाल सुकर करेन. काही सुखद अनुभव येतील. मनासारखा धनलाभ होईल. पशुप्रेम वाढीस लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुखकारक दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम होणार आहे. मन आनंदी राहील. स्वतःसाठी खर्च कराल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी. (सायन ज्योतिषी) 8087520521