असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष
  • Positive News
  • एप्रिल 21 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाइल 9272311600 

मंगळवार, *21 एप्रिल 2026*. वैशाख शुक्ल पंचमी

राहुकाळ - दुपारी 3 ते 4:30 

आज  चांगला दिवस.*आद्य शंकराचार्य जयंती*
आज जन्मलेल्या बाळाची रास वृषभ/दुपारी 1:01 नंतर मिथून

*21* एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ????  
   
     तुमच्यावर मंगळ आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. पोकळ दिमाख, गर्व, उच्च पदाला जाण्याची महत्वाकांक्षा असते. तुम्ही प्रेमळ असून मुलांबद्दल विशेष प्रेम असते. आयुष्यात प्रसिद्धी व मान मरातब उशिरा मिळतात .उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असून लोकांना मोहित करण्याची शक्ती असते सर्वांमध्ये तुम्ही लोकप्रिय असता. 
मंगळ स्पष्टवक्ता, शीघ्रकोपी, अतिश्रम करणारा तर हर्षल अकल्पित घटना घडवून आणणार आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात आणि सतत प्रगती करण्याचा तुम्हाला ध्यास लागलेला असतो. तुम्हाला धार्मिक गोष्टींबद्दल ओढ असली तरी कर्मकांडावर तुमचा विश्वास नसतो. तुम्ही दानशूर असतात मात्र त्याचे प्रदर्शन करतात. तुम्हाला न्यायाचे आवड असते. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात. उत्साही आहात आणि सतत कार्यमग्न असतात. तुम्ही कारखाना चांगल्या प्रकारे चालवू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमच्या अंगावर आलेली जबाबदारी तुम्ही योग्यपणे पार पाडू शकतात. इतरांनी तुमच्या कामात लुडबुड केलेली तुम्हाला आवडत नाही. तुमच्या डोकं जर तुम्ही शांत ठेवले तर जीवनात तुम्ही अधिक प्रगती करू शकाल. तुम्ही हट्टीपणा टाळला पाहिजे. तुम्ही शुद्ध प्रेम करणारे, दयावान आणि नीतिमान आहात. तुमच्यात आत्मविश्वास पुरेपूर भरलेला आहे. तुम्हाला इतरांच्या सल्ल्याची गरज पडत नाही. तुमचे वागणे रुबाबदार असून टापटीप आणि व्यवस्थित पण आढळतात. तुम्हाला उत्तम संभाषण शैली लाभलेली आहे. आणि तुम्ही बोलण्यात मोकळेढाकळे असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो आणि स्वभाव मिश्किल असतो. सहसा इतरांचा द्वेष किंवा मत्सर तुम्ही करत नाहीत.खर्चिक वृत्ती असून आयुष्य आरामदायी कसे जाईल या कडे लक्ष असते.पैशांवर आधारित सर्व सुख उपलब्ध होतात. इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असून कोणत्याही एका विषयात तुम्ही पारंगत होत नाहीत. तुम्ही अतिशय प्रेमळ व निष्ठावान आहात .स्वभाव लहरी असून कृतीने हळवे आहात. पतीला योग्य ती सर्व साथ देण्यात तुम्ही वाकबगार असतात. उत्तम सह धर्मचारणी म्हणून लौकिक मिळवता.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- किरमिजी.

*आजचे राशिभविष्य*

मेष:-

मैत्रीणींनो आज
सकाळी पैशांबाबत किंवा घरातील एखाद्या गोष्टीबाबत चर्चा सुरू राहील. दुपारनंतर एखादा महत्त्वाचा फोन, मेसेज किंवा भेट होऊ शकते. तुमचे बोलणे प्रभावी राहील. महिलांनी नवीन ओळखींतून फायदा करून घ्यावा.

वृषभ :-

मैत्रीणींनो आज
सकाळपर्यंत तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला राहील. स्वतःसाठी काही नवीन ठरवाल. दुपारनंतर आर्थिक लाभाचे संकेत आहेत. खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल ठेवा.

मिथुन :-

मैत्रीणींनो आज
सकाळी थोडी अस्वस्थता किंवा मनात संभ्रम राहू शकतो. दुपार नंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने ऊर्जा, उत्साह आणि आकर्षण वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळ आहे.कामे मार्गी लागतील.

कर्क :-

मैत्रीणींनो आज सकाळच्या सत्रात
मैत्रिणी, सहकारी किंवा ओळखीच्या महिलांकडून मदत मिळेल. दुपारनंतर थोडा एकांत किंवा विश्रांतीची गरज वाटेल. मनातील भावना कोणाशी तरी बोलून व्यक्त केल्यास हलके वाटेल.

सिंह :-

मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल. वरिष्ठ किंवा घरातील मोठ्यांकडून कौतुक मिळू शकते. दुपारनंतर मित्रपरिवारातून किंवा सोशल नेटवर्कमधून एखादी चांगली बातमी मिळेल.मानसन्मान मिळेल.

कन्या :-

मैत्रीणींनो आज
भाग्याची साथ मिळेल. सकाळी प्रवास, शिक्षण किंवा धार्मिक गोष्टींकडे लक्ष जाईल. दुपारनंतर करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. महिलांनी स्वतःचे मत ठामपणे मांडावे.

तूळ :-

मैत्रीणींनो आज
आज काही गोष्टींबाबत मनात संभ्रम राहू शकतो, पण दुपारनंतर परिस्थिती स्पष्ट होईल. आर्थिक किंवा कुटुंबाशी संबंधित एखादा प्रश्न सुटू शकतो. दूरच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक :-

मैत्रीणींनो आज
नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. सकाळी जोडीदाराचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर अचानक आर्थिक लाभ किंवा एखादे गुपित समजण्याची शक्यता आहे. भावनिक निर्णय टाळा.

धनु :-

मैत्रीणींनो आज
सकाळी कामाचा ताण जास्त जाणवेल. दुपारनंतर जोडीदार, प्रिय व्यक्ती किंवा भागीदारीतून फायदा होईल. संवादातून गैरसमज दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.

मकर :-

मैत्रीणींनो आज
आजचा दिवस आनंददायी राहील. मुलांबाबत, प्रेमसंबंध किंवा सर्जनशील कामात चांगले यश मिळेल. दुपारनंतर कामात व्यस्तता वाढेल, पण त्यातून समाधानही मिळेल.

कुंभ :-

मैत्रीणींनो आज
घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. दुपारनंतर मन हलके होईल. प्रेम, आवडत्या छंद आणि मित्रांसोबतचा वेळ आनंद देईल.

मीन :-

मैत्रीणींनो आज
आज तुमचे बोलणे आणि कल्पना इतरांना प्रभावित करतील. दुपारनंतर घर, आई किंवा कुटुंबाशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास दिवस अधिक चांगला जाईल.

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाईल 9272311600 
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी 
*सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

संबंधित बातम्या