असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष:-

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष:-
  • Positive News
  • एप्रिल 4 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाइल 9272311600 

शनिवार, *4 एप्रिल 2026*. चैत्र कृष्ण द्वितीया

राहुकाळ - सकाळी  9 ते 10:30 

आज  उत्तम दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ(हर्षण योग)

*4* एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ????   

     तुमच्या जीवनात बरेचदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवास येतात. अनेक विलक्षण आणि चमत्कारीक घटना तुमच्या आयुष्यात घडत असतात. तुम्ही तुमच्या राहत्या जागेत, नोकरी व्यवसायात सतत बदल करत असतात. त्यामुळे कधीकधी आयुष्यात अस्थिरता निर्माण होते. तुमच्या मध्ये उत्साह आहे आणि तुम्ही सतत प्रगती करत असतात. तुमच्या मनाचे पातळी उच्च दर्जाची आहे. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी तुम्ही योगदान देतात. रूढी आणि बंधने किंवा परंपरा यांचा तुम्हाला तिरस्कार असतो. तुम्ही सच्चा मनाचे असतात आणि खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तुमचा स्वभाव परखड आहे. त्यामुळे अनेकदा तुमचे विचार इतरांना पटत नाही. समोरची व्यक्ती दुखावली तरी चालेल मात्र आपला स्पष्टवक्तेपणा तुम्ही सोडत नाहीत. त्यामुळे अनेकदा मित्रांचा गैरसमज होतो. तुम्ही अहंकार आणि उद्धटपणा टाळला पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या धोक्यांना तुम्ही घाबरत नाही आणि यशस्वीपणे तोंड देतात. तुमचा मैत्रपरिवार मोठा असतो. घरातून किंवा कौटुंबिक संबंधातून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. तुमच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली सहन होत नाही ,जर केली तर तुम्ही तुमचे काम सोडून बाहेर पडतात .डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात चांगले यश मिळेल. परंतु हट्टीपणा व उद्धटपणामुळे तुम्हाला कायम अडचणी येतात .तुम्ही निर्भीड असून कोणत्याही धोक्याला तोंड देण्यास तयार असतात. जीवनात सतत बदल असावा यामुळे मित्रपरिवार सतत बदलत असतो .आयुष्यात अनेक अडचणी विलंब असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात .खर्चिक असून घरात सर्व सुख सुविधा ठेवण्याकडे कल असतो .तुम्ही तलक व आकर्षक आहात .तीव्र इच्छाशक्ती असून नीट नेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. पत्नीला त्याच्या व्यवसायात मदत करतात .घरातील सजावट उत्तम तऱ्हेने करता .बऱ्याच वेळा स्वतःचा वरचढ पणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा आपल्या चमत्कारिक स्वभावामुळे सबंध दिवस खराब जातो .तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे पण ओढ नसते .बऱ्याच वेळा तुम्ही अस्वस्थ असता अशा वेळी एक किंवा दोन भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहणे उपयुक्त ठरेल.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा,निळा,गुलाबी

शुभ रत्ने:- हिरा,मोती,पोवळे
(कुंडली तपासूनच रत्ने वापरावी)

*आजचे राशिभविष्य*

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज तुमच्यासाठी नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराशी छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतो, पण संवादाने तो मिटेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
दिवस काम आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. गुरू-बुधाचा प्रभाव तुमच्या नियोजनात  मदत करेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
आज तुमच्यासाठी सर्जनशील आणि आनंददायी दिवस आहे. प्रेमात यश. मुलांबाबत आनंदाची बातमी मिळू शकते.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
घरगुती गोष्टींमध्ये थोडा तणाव जाणवू शकतो. आई किंवा घरातील मोठ्यांशी मतभेद होऊ शकतात.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
आज तुम्हाला बोलण्यातून लाभ,  यश मिळेल. मित्र-मैत्रिणींची साथ लाभेल. छोट्या प्रवासाचे योग आहेत.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. नवीन पैशाचा स्रोत मिळू शकतो. पण खर्चही वाढू शकतो.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्व खुलून येईल. नवीन निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे.सोशल मीडियावर तुमच्या टिप्पणी ला प्रसिद्धी मिळेल.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
आज थोडा मानसिक तणाव वाढू शकतो, मनस्थिती द्विधा राहील . एकांतात वेळ घालवण्याची गरज वाटेल.ध्यान धारणा, प्राणायाम करा.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
मैत्रमंडळी कडून मदत मिळेल. सामाजिक क्षेत्रात  तुमची पत वाढेल . काही नवीन संधी मिळू शकतात.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
कामात मध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. पण कामाचा ताण वाढू शकतो.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
आजचा दिवस भाग्यवान ठरू शकतो. नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग आहेत.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
आज आर्थिक व्यवहारात सावध राहा. अचानक खर्च येऊ शकतो. नातेसंबंधात गुपिते उघड होण्याची शक्यता.

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाईल 9272311600 
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी 
*सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

संबंधित बातम्या