असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष.
  • Positive News
  • एप्रिल 10 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य महिलांसाठी ज्योतिष.

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाइल 9272311600 

शुक्रवार, *10 एप्रिल 2026*. चैत्र कृष्ण अष्टमी
*कालाष्टमी*

राहुकाळ - सकाळी 10:30 ते 12

आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास धनू /संध्याकाळी 6:04 नंतर मकर.

*10* एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ????  
    
     तुमच्यावर रवि आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहेत. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आणि वृत्तीचे आहात. सतत बदल करण्याकडे ओढा असून फारकाळ एकाच गोष्टीत तुम्ही रमत नाहीत. तुम्ही उद्योग प्रिय आणि सतत कामात मग्न असतात. तुमची इतरांवर चटकन छाप पडते. वक्तृत्व उत्तम असते. कलाप्रिय आहात. मैत्रीत आणि व्यवसायात अनेक बदल होतात. इच्छाशक्तीदांडगी असून अनेक विषय चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेतात. व्यावहारिक जीवनाबरोबरच गूढ गोष्टीचे आकर्षण असते. स्वतःचे विचार इतरांवर लादण्याची वृत्ती असू शकते. जीवनातील रिद्धी आणि परंपरा तोडण्याचा स्वभाव असतो. आयुष्य चळवळीने भरलेले असते.  विचारसरणी तर्कशुद्ध असते. बोलण्यात नाजूकपणा नसतो. स्वभाव तापट आणि धाडसी असतो. विचारांशी ठाम असतात. तुम्हाला सर्व सुखे प्राप्त होतात. 
महत्वाकांक्षी व्यक्ती ची उत्तम पत्नी होऊ शकता. स्वतःचा उद्योग/नोकरी करून उत्पन्नात भर घालता. विनोदी स्वभाव व चतुर स्वभावाने सामाजिक जीवनात यश मिळते.मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांशी राखतात.अनेक गोष्टीत रस असतो.रूढी निष्ठ  स्वभाव नसतो.मात्र जोडीदार निवडताना आपल्यासारखाच उत्साही, सौन्दर्य प्रेमी,छान पोशाखची आवड असलेला,घरात व समाजात मिसळणारा असाच निवडावा.धैर्य, आक्रमकता, उत्साह,झटपट पणा असे लोक प्रिय असतात.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, नारंगी, जांभळा, पिवळा.

शुभ रत्ने: माणिक, पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा आधार घ्यावा)

*आजचे राशिभविष्य*


♈ मेष

मैत्रीणींनो आज
दिवसाच्या पहिल्या भागात उत्साह आणि नवीन कल्पना येतील. धाडसाने घेतलेले निर्णय यश देऊ शकतात.
संध्याकाळनंतर कामात शिस्त आणि जबाबदारी वाढेल.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
आर्थिक लाभाचे योग आहेत.नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस, पण संध्याकाळनंतर खर्चावर नियंत्रण ठेवा.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
बुद्धीचा चांगला वापर करून कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या सुधारणा दिसेल, पण कागदपत्रे नीट तपासा.
संवादातून फायदा होईल. संध्याकाळी थोडा ताण जाणवू शकतो.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी अचानक बदल होऊ शकतात. संयम ठेवा. जोडीदारासोबत संवाद महत्त्वाचा ठरेल. थोडे मतभेद होण्याची शक्यता.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
आज सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल.नवीन कल्पना मांडण्यासाठी उत्तम वेळ. कला, मीडिया, शिक्षण किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात विशेष यश मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या चांगले संकेत आहेत. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
घरगुती आणि करिअर दोन्ही ठिकाणी संतुलन साधावे लागेल.कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण अनावश्यक खर्च टाळा.
 संध्याकाळनंतर जबाबदाऱ्या वाढतील.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
प्रवास, शिक्षण आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांकडून मदत मिळेल.
लहान प्रवास किंवा कामाशी संबंधित बदल होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
आर्थिक व्यवहारात लाभ संभवतो. पण अचानक निर्णय टाळा. संध्याकाळी मन शांत ठेवा.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
दिवसाच्या पहिल्या भागात आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचे विचार इतरांना प्रभावी त करतील.संध्याकाळनंतर व्यावहारिक दृष्टिकोन आवश्यक ठरेल.

♑ मकर

मैत्रीणींनो आज सकाळ चे सत्र संथ असेल.गैरसमज टाळा.
संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल, त्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज दिवसभर उत्साहात असाल.
मित्र आणि सामाजिक जीवनात नवीन संधी मिळतील. नवीन ओळखी होतील.अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.आत्मविश्वास वाढेल.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल.
संध्याकाळनंतर मन आनंदी होईल.

*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक
मोबाईल 9272311600 
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी 
*सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

संबंधित बातम्या