असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २२ मे
गुरुवार, २२ मे २०२५. वैशाख कृष्ण दशमी. ग्रीष्म ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे"
नक्षत्र - पू. भा./(संध्याकाळी ५.४७ नंतर) उ. भा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ/(दुपारी १२.०८ नंतर) मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी शुभ योग आहे. मात्र दुपारी व्यय स्थानी चंद्र आहे. वाहन सुख लाभेल. संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवसाची सुरुवात अत्यंत अनुकूल आहे. उच्च शिक्षण, दूरचे प्रवास यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शुक्र, शनी, राहू, नेपच्यून शुभ आहेत. कोडे सुटतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नैतिक मार्ग सोडू नका. नोकरीत स्थिरस्थावर होणास साहाय्यभूत ग्रहमान आहे. वरिष्ठ खुश होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. सर्व स्वप्ने साकार होतील. वेळ 'न' दवडता कामाला लागा. दूरचे प्रवास घडतील. सिद्ध व्यक्तीचा सत्संग लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी शनी युक्त चंद्र आहे. काळजी घ्या. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर नको. संध्याकाळ आनंदाची.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आर्थिक भरभराट होईल. मंत्रविद्या सिद्ध होण्याचा दिवस आहे. शत्रूचा त्रास मात्र जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. अधिकार वाढतील. भागीदाराशी मतभेद होऊ शकतात. चोरीचे भय आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. शेअर्स/सट्टामध्ये गुंतवणूक नको. सरकारी कामात प्रगती होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. वास्तू संबंधित अडचणी दूर होतील. सरकारी कामे रेंगाळतील. भागीदाराशी मतभेद संभवतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमानाचा लाभ उठवा. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कामात अनुकूलता वाढेल. राजकीय शत्रू पराभूत होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. योग्य करणासाठी खर्च कराल. धन धान्य वाढेल. सामाजिक कार्यातून सन्मान मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीत दुपारी चंद्र आहे. सकळ संथ असणार आहे. नंतर अनुकूल ग्रहमान आहे. तरीही फार मोठी जोखीम नको.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.