असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २१ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २१ मे
  • Positive News
  • मे 21 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २१ मे

बुधवार, २१ मे २०२५. वैशाख कृष्ण नवमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. विश्वावसु नाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 

"आज वैधरुती वर्ज्य दिवस आहे." 

चंद्र नक्षत्र - शततारका (राहू)/ (संध्याकाळी ६.५८ नंतर) पू. भा.(गुरू) आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. (वैधरुती योग शांती)  
 
मेष:- अनुकूल चंद्र आहे. भौतिक सुख मिळेल. उत्तम सहकार्य लाभेल. सखोल संशोधन कराल. बोलताना कळजी घ्या.  
     
वृषभ:-  मन आनंदी राहील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मनासारख्या घटना घडतील. प्रसन्न वाटेल. 
 
मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे. पालकांची पुण्याई कामास येईन. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल.  

कर्क:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. अनुकूल गुरू मदत करेल. अध्यात्मिक लाभ होतील.
 
सिंह:- आत्मविश्वास वाढेल. कर्तृत्व दाखवल्यास आज यश मिळेल. भागीदारीत वादविवाद टाळा. कायदेशीर सल्ला मोलाचा ठरेल.
  
कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. मत्सर त्रास जाणवेल.
 
तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे.  सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे.
 
वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. नव्या व्यक्ती भेटतील.

धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. गूढ बाबींचे आकर्षण निर्माण होईल.
 
मकर:- संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. संपत्ती वाढेल.
 
कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. सखोल संशोधन करण्यास उत्तम कालावधी आहे. 
 
मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीतून मदत होईल. दानधर्म करावा.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या