असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १९ मे
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
सोमवार, १९ मे २०२५. वैशाख कृष्ण षष्ठी/सप्तमी. ग्रीष्म ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - श्रवण/धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. (विष्टी करण शांती)
"आज क्षयतिथी आहे."
मेष:- चंद्र प्रतियुती मंगळ, चंद्र केंद्र बुध, चंद्र लाभ शुक्र आहे. नोकरीत चांगले अनुभव येतात. वरिष्ठ मदत करतील. शत्रू वाढतील. चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. भेटी गाठी होतील. मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटतील. वाहन/ मौल्यवान वस्तूची दुरुस्ती करावी लागेल.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. उच्च दर्जाचे आध्यत्मिक लाभ होतील. इतरांना मदत कराल. दानधर्म घडेल.
कर्क:- दिवस काहीसा अनुकूल आहे. महत्वची कामे पूर्ण करून घ्या. बुद्धीचा योग्य वापर करा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी वाद होऊ शकतात.
सिंह:- नवनवीन संधी चालून येतील. आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मोठी झेप घ्याल. यंत्रांपासून धोका संभवतो. काळजी घ्या.
कन्या:- संतती कडून चांगली बातमी समजेल. शिक्षणात यश मिळेल. छोटी सहल घडेल. वाहन जपून चालवा. मोबाईल फोन/ संगणक हाताळताना काळजी घ्या.
तुळ:- सुरुवात चांगली होणार आहे. नातेवाईक येतील. घरगुती समारंभ घडेल. समाज मान्यता मिळेल. पत्नीच्या लहरी संभाळाव्या लागतील.
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. जोडीदाराची साथ लाभेल. मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. भय कमी होईल. उष्णता/ आग यांचे भय आहे.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल. कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही.
कुंभ:- व्यय स्थानी चंद्र आहे. साचलेली कामे पूर्ण करा. येणाऱ्या अनुकूलतेसाठी तयारी करा. खर्च वाढेल. फारशी अनुकूलता नाही.
मीन:- चंद्र अनुकूल आहे. प्रगती साध्य कराल. आरोग्य सुधारेल. स्वप्ने साकार होतील. संभाव्य धोका टळेल. बोलताना काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
१९ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, बुध आणि रवी या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जन्म चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात होतो. तुम्ही संशोधक वृत्तीचे आहात. स्वभाव तापट असून भांडणाचे प्रसंग वरचेवर येत राहतात. प्रेमात उतावीळ होणे ठीक नाही. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. तुम्ही इतरांची परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकतात. इतरांची माहिती तुम्ही गुप्त ठेवतात. त्यामुळे तुम्ही विश्वासू असतात. स्वभाव स्वतंत्र असतो. इतरांची लुडबुड चालत नाही. तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. तुम्ही व्यावहारिक सल्ला उत्तम प्रकारे देतात. तुम्हाला घराचा फारसा ओढा नसतो. तुम्ही अभ्यासू आहेत. जबाबदारीच्या जागा तुम्ही पैलू शकतात. तुमचा स्वभाव धडपडा असतो. तुम्हाला मोठेपणा आणि प्रतिष्ठा मनापासून आवडते. व्यवसाय किंवा नोकरीत तुम्हाला चांगले यश मिळते. तुम्ही तत्परतेने इतरांना मदत करतात. तुमची आवड नेहमी उच्च दर्जाची असते. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावा असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. तुमच्या कामात सातत्य असतं आणि तुम्ही कार्यक्षम आहात. तसे तुम्ही प्रेमळ आहात. मित्रां बद्दल तुम्हाला सहानुभूती आणि आदर असतो. तुम्ही कलासक्त असतात. सौंदर्याचे भोक्ते असतात. अनेकदा सुगंधी द्रव्ये वापरणे तुम्हाला आवडते. तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकतात. उच्चप्रतीचे कपडे, दागिने, वाहन, घर तुम्ही वापरत असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला गणित, शास्त्र आणि व्यापार यांची आवड आहे. तुम्ही झटपट काम करतात. तुमचा कामाचा वेग जास्त असतो. एखादे काम हाती घेतल्यावर तुम्ही त्याचे पूर्वनियोजन उत्तम प्रकारे करतात. तुम्हाला गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आहात. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी असते. संशोधन करण्यात तुम्हाला रस असतो. तुमच्या बोलण्यात मोहक पणा आहे. लोकांना तुमचे बोलणे आवडते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि एखाद्या गोष्टीचा उत्तम विश्लेषण करू शकतात. हट्टीपणा, उतावीळपणा आणि स्वार्थीपणा टाळला पाहिजे.
व्यवसाय:- तुम्ही एकाच व्यवसायात रमत नाहीत. व्यवसायात बदल करत असतात. पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरनेट, इंटरियर डेकोरेटर, डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट, इंजिनियर.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- सोनेरी,पिवळा, हिरवा.
शुभ रत्ने:- माणिक, पाचू, मोती. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घ्यावे)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521