असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १७ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १७ मे
  • Positive News
  • मे 17 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १७ मे

शनिवार, १७ मे २०२५. वैशाख कृष्ण पंचमी. वसंत/ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसु नाम संवत्सर.राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

चंद्र नक्षत्र - पू. षा./ (संध्याकाळी ५.४४ नंतर) उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.  

"आज चांगला दिवस आहे." 
  
मेष:- उद्या पहाटे रवी युती हर्षल असणार आहे. अनुकूल ग्रहमान आहे. हातून चांगले काम घडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. सिद्धी प्राप्त होतील.
     
वृषभ:- दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. स्वप्ने साकार होतील. मित्र मंडळी समवेत सहभोजन कराल. प्रवास घडतील. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा.
 
मिथुन:- ग्रहमान अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. विनाकारण एखाद्या प्रकरणात गोवले जाण्याची शक्यता आहे. 

कर्क:- ठीक ठाक दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील. येणी वसुली होतील. शत्रू प्रबळ होईल.
 
सिंह:-  अनुकूल ग्रहमान आहे. काही नवीन संधी चालून येतील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल.  
  
कन्या:- चांगले ग्रहमान आहे.  आरोग्य सुधारेल. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. घरगुती कामाला वाहून घ्याल.
 
तुळ:- आर्थिक लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. महिलांना यश मिळेल.  सामाजिक कार्यात जपून व्यक्त व्हा.
 
वृश्चिक:- दिवस अनुकूल असला तरी एकूणच आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण सुधारेल. नात्यात गैरसमज होऊ शकतात. 

धनु:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. सिद्ध व्यक्तीचा सत्संग लाभेल. दानधर्म कराल. गृह सजावट कराल. स्थावर संपत्तीवर लक्ष ठेवावे लागेल.  
 
मकर:- वेळोवेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.  अनुकूलता वाढेल. संध्याकाळ आनंदाची. एखादी स्फोटक घटना घडू शकते.
 
कुंभ:- चंद्र अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे हाती येतील. उत्साह वाढेल. संधीचे सोने करा.
 
मीन:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. इतरांचे सहकार्य मिळेल. एखाद्या थरारक घटनेतून तुम्हाला लाभ मिळू शकतो.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

संबंधित बातम्या