असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १४ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १४ मे
  • Positive News
  • मे 14 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १४ मे

बुधवार, १४ मे २०२५. वैशाख कृष्ण द्वितीया. वसंत ऋतू. शके १९४७, संवत २०८१, विश्वावसु नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 

"आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे" 

नक्षत्र - अनुराधा/ ज्येष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (परीघ/शिव योग)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. चंद्राचा मंगळ आणि शुक्राशी त्रिकोण योग आहे. धनप्राप्ती होईल. चैनीवर खर्च कराल. अचानक धनलाभ होईल. महिलांकडून आर्थिक फायदा होईल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. लॉटरी मध्ये यश मिळू शकते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मन मोठे कराल.गृह सजावट होईल. जमीन व्यवहारात यश मिळेल. वस्त्र खरेदी होईल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यवसाय वाढेल. प्रवास संभवतात. अचानक लाभ होतील. चांगली बातमी समजेल. दागिने घडतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षमता वाढतील. नेतृत्व कराल. गायकांना उत्तम दिवस आहे. मेजवानी मिळेल. संतती बाबत चांगली बातमी समजेल.  
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक आवक वाढेल.  व्यापार वृद्धीगत होईल. नात्यातून लाभ होतील. मन आनंदी करणारा दिवस आहे.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कलाकारांना उत्तम दिवस आहे. स्थिर स्थावर व्हाल. महिलांना दागिने मिळतील. वाहन सुख लाभेल. दबदबा वाढेल. 
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. मेजवानी मिळेल. भेटवस्तू मिळतील. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बाराव्या स्थानी चंद्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रवास घडतील. धाडस दाखवाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. स्वप्ने स्कार होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रचंड आर्थिक यश लाभेल. व्यवसाय वढेल. येणी वसूल होतील.  कलाकारांना यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण करा. अर्थलाभ होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पत्नीसाठी वेळ द्याल.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या