असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १३ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १३ मे
  • Positive News
  • मे 13 2025

Share on  

मंगळवार, १३ मे २०२५. वैशाख कृष्ण प्रतिपदा. वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, सनावत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

चंद्र नक्षत्र - विशाखा/अनुराधा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (परीघ योगाची शांती करून घ्यावी)

मेष:- चंद्राचा शनिशी त्रिकोण योग आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे करून घ्या. शत्रू पराभूत होतील. व्यापार वाढेल. कोर्टात यश मिळेल. दुपारनंतर अनुकूलता कमी होईल.   
     
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. पशूंपासून धोका संभवतो. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.
 
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. विनाकारण वाद होऊ शकतात. खर्च वाढतील. लेखकांना त्रास होऊ शकतो. 

कर्क:- आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. चंद्र प्रतियुती हर्षल असल्याने अनुकूल हर्षलचा आज फारसा चांगला अनुभव येणार नाही. घरगुती काम करताना काळजी घ्या. बोलताना शब्द जपून वापरा.
 
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नातेवाईकांमुळे  भाग्योदय होईल. नोकरीत त्रास होऊ शकतो. वाहन दुरुस्ती करावी लागेल.
  
कन्या:-  कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.
 
तुळ:- तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मात्र अपघाताचे भय आहे. वक्तृत्व चमकेल.   
 
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी अनुकूल नाही. दुपारनंतर काही फरक पडेल. भगिदारी व्यवसायात वाद होऊ शकतात. 

धनु:-  अनुकूल ग्रहमान आहे. सुरुवातीला चांगले अनुभव येतील. दुपार नंतर काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल.
 
मकर:- दशम आणि एकादश स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या.
 
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे.  आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. घरगुती वाद होऊ शकतात.
 
मीन:- संमिश्र दिवस आहे. सकाळी फारशी अनुकूलता नाही. अति धाडस नको. दानधर्म करा. देणी द्यावी लागतील.  

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या