असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १३ जून
आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि शेवटी आजचे राशिभविष्य:-
१३ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, शुक्र आणि बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्हाला वरिष्ठ पदावर नोकरी लागते. वयाच्या 31 पासून भाग्योदय होतो. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. कामात सातत्य आणि चिकाटी आहे. त्याचा तुम्हाला लाभ होतो. विकारांवर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे. तुमची स्मरणशक्ती उत्तम आहे. तुम्ही उच्च वर्तुळात वावरतात. जीवनात प्रेमप्रसंग येऊ शकतात. आयुष्यात सर्वकाही शांतपणेमिळावे, त्याचा बोभाटा असू नये असे तुम्हाला वाटते. अनेकदा तुमच्या वागण्यात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला अनेक विलक्षण आणि अनपेक्षित घटनांचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे, तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती आणि तल्लख पण आहे. तुमची विचारसरणी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे. तुमच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. हातात घेतलेल्या कार्यात तुम्ही पूर्वनियोजन करून उत्तम यश मिळवतात. तुम्हाला नाविन्याची आणि प्रवासाची आवड आहे. रूढी, परंपरा तुम्हाला फारसे आवडत नाहीत. आपल्या आयुष्यात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटत राहते त्यामुळे तुमचे घर, नोकरी आणि मित्रपरिवार देखील बदलत राहतो. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. तुमच्या वागण्या मध्ये एक ठामपणा आहे. तुम्हाला तुमच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची चांगली जाणीव झाल्यास तुमच्यासाठी आयुष्यात अशक्य असे काहीच नाही.
व्यवसाय:- जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, बँकिंग, आयात-निर्यात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कान नाक डोळे तज्ञ, संशोधन.
शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, रविवार.
शुभ रंग:- जांभळा, निळा, पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
ज्येष्ठ कृष्ण द्वितीया/तृतीया. शुक्रवार, १३ जून २०२५. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.
चंद्रनक्षत्र - पूर्वा आषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा सूर्याशी अशुभ योग आहे. अध्यात्मिक लाभ होतील. प्रवास घडतील. मात्र वाहन जपुन चालवावे. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरीत तणाव जाणवेल. संपत्तीच्या कारणवरून विनाकारण वाद होऊ शकतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पुण्याई कामाला येईल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. भागीदाराशी विवाद नकोत. सरकारी कामात दिरंगाई होईल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. अधिक कष्ट करावे लागतील. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. खर्च वाढतील. सन्मान मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. प्रशंसा होईल. प्रतिष्ठा पणास लागेल. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षा भंग होऊ शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नियोजन बदलेल. नवीन ओळखी होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण जरा तणावाचे राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग बरा राहील. प्रवासाचे नियोजन बदलेल. नात्यात वादविवाद संभवतात. सरकारी दंड बसू शकतो.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. शत्रूला कमी लेखू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. तरीही ग्रहमान संमिश्र आहे. सहकार्य मिळेल. शत्रू त्रास देतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सुर्या उपासना करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चंद्र अनुकूल आहे. प्रगती साधणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. मात्र जास्त मोठी जोखीम नको. खर्चात वाढ संभवते.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरी/व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. नवीन संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
-ज्योतिशी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.