असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  २ ऑगस्ट

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  २ ऑगस्ट
  • Positive News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  २ ऑगस्ट

आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-

शनिवार, २ ऑगस्ट २०२५. श्रावण शुक्ल अष्टमी/नवमी. विश्वासूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

"आज वर्ज्य दिवस आहे" 

नक्षत्र: विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  अनुकूल दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. इतरांना मदत कराल. तुमचा स्वभाव करारी आहे. आज तुम्ही कठोर निर्णय घ्याल. आवडती व्यक्ती भेटेल. कोर्ट कामात यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यापार वाढेल. भेटवस्तू मिळतील. मानासारखी कामे पूर्ण होतील. मन उत्तेजित राहील.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. लॉटरी मधून लाभ मिळतील. प्रेमात यश लाभेल. संतती बाबत खुश खबर मिळेल. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. जमीन व्यवहारात लाभ होतील. वाहन सुख लाभेल. छोटी सहल घडेल. मात्र मोठे निर्णय आज नकोत. बुद्धी भ्रम होऊ शकतो. वाहन व्यवहारात तोटा संभवतो.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल. मात्र शत्रूला कमजोर समजू नका. एखादा सामान्य व्यक्ती देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
  
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगले अनुभव येतील. तुमच्या राशीतील मंगळ तुम्हाला आक्रमक आणि तडफदार बनवेल. कामात प्रगती होईल. कामाचा वेग वाढेल. पैशांची तजवीज होईल. जोडीदाराची नाराजी दूर करावी लागेल. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. सहावा शनी आणि आठवा हर्षल यांची नाराजी जाणवेल. कोणत्याही गुंत्यात गुंतू नका. विश्वासु व्यक्तीचाच हात धरा. दशम रवी तुमची नोकरीतील प्रतिष्ठा सांभाळेल.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. कामाचे नियोजन बदलले जाईल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. सप्तम स्थानी हर्षल आहे. शत्रूंला कमी लेखू नका. कनिष्ठ सहकारी अडचणीत आणू शकतात. भागीदारी व्यवसायात सावध भूमिका घ्या. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. सप्तम शुक्र तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तींना प्रवेश देईन. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अष्टम रवी मात्र तुम्हाला संभाळवून पावले टाकण्यास सूचित करत आहे.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दशम स्थानी चंद्र आहे. व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. आरोग्य सुधारेल. शब्द जपून वापरा. औषधांची विरोधी प्रतिक्रिया येऊ शकते. योग्य सल्ला घ्या. घशाची काळजी घ्या. 
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रसन्न ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. व्यावसायिक कामातून यश मिळेल. तुमच्या राशीत राहू आहे. आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. दररोज राहूचा जप करावा. काळ्या कुत्र्याला अन्नदान करावे.
 
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. अजूनही फर्सवही अनुकूलता नाही. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. दानधर्म करण्यास चांगला दिवस आहे. जुने गूढ उकलण्यास आज मदत मिळेल. काही प्रशांची उत्तरे मिळतील.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

२ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्यात प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे. तुम्ही योग्य तर्हेने विचार करणारे, निस्वार्थी असून इतरांच्या भावनांची कदर करतात. कोणत्याही कामातील उद्दीष्ट न विसरता त्यातील सर्व बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यात उतरवतात. तुम्ही उत्तम सहकारी असतात. तुम्ही शास्त्रशुद्ध, व्यवस्थित आणि टापटीप असतात. तुम्ही स्वप्नाळू आणि एकांतात रमणारे आहात. तुमच्यात प्रतिष्ठा, मोठपण, कल्पकता, अधिकार या गोष्टी असतात. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. व्यवसायात तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. रंगमंच, सिनेमा, सहली यांचे तुम्हाला आकर्षण असते. तुमच्यात उत्स्फूर्त आणि उपजत कला असतात. तुमच्या वागण्यात रुबाब असतो. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो.  मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.

व्यवसाय:-  संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या