असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १ ऑगस्ट

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १ ऑगस्ट
  • Positive News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य  १ ऑगस्ट

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-

शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५. श्रावण शुक्ल अष्टमी. विश्वावसू नाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू.  राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज वृद्धी तिथी आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. 

चंद्रनक्षत्र - स्वाती.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. (विष्टी करण शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी त्रिकोण योग आहे. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळू शकते. तुमच्या हातून आज पुण्य कर्म घडेल. शेजाऱ्यांशी वादविवाद टाळावेत. पशूंपासून सावध राहावे. मौल्यवान वस्तू सांभाळा.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. आज कर्जे घेऊ नका. तुमच्या शब्दला मान मिळेल. आज मनासारखे पदार्थ चाखण्यास मिळतील. आरोग्य सांभाळावी लागेल.    
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र ग्रहमान आहे. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. शेअर्स मध्ये अंदाज बरोबर येतील. मात्र बोलताना कळजी घ्या. वरिष्ठ नाराज होऊ देऊ नका.  

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी कामे पार पडतील. चंद्र - गुरू योग स्वप्ने साकार करतील. अचानक लाभ होतील. अध्यात्मिक सुखे प्राप्त होतील. दानधर्म कराल. एखाद्या अनाथ आश्रमास भेट द्याल. व्यावहारिक पातळीवर मात्र मनाचा गोंधळ उडेल. घर खरेदी पुढे ढकलली जाईल. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. अनुकूल गुरुमुळे वास्तूचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल. मात्र अपेक्षित सन्मान मिळणार नाही. चुकीचे व्यावसायिक निर्णय घेतले जाऊ शकतात.    
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी संमिश्र ग्रहमान आहे. काही सुखद घटना घडतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. कामाचा वेग वाढेल. रवी अन बुद्धाची अनुकूलता असली तरी आज त्याचा प्रभाव कमी जाणवेल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. गुरुशी शुभ योग आहे. मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. देवतांची कृपादृष्टी अनुभवास येईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. भ्रमंती घडेल.  
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारशी अनुकूलता नाही. आज महत्वाची कामे शक्यतो नकोत. तुम्ही धाडसी आहात.
मात्र आज नैतिकतेची चाड ठेवून कामे करावीत. हातून चूक होऊ देऊ नका. प्रवासात काळजी घ्या. सरकारी अधिकाऱ्यांशी वाद नकोत.
   
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र अनुकूल आहे. व्यावसायिक आणि इतर सर्व प्रकारचे लाभ होतील. मन आनंदी राहील. इच्छा पूर्ण होतील. मित्र मंडळी भेटतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. पत्नीची साथ लाभेल. मात्र घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी.   
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दशम स्थानी चंद्र आहे. बऱ्यापैकी अनुकूल दिवस आहे. नोकरीत खुश खबर मिळेल. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. आजचा दिवस व्यावसायिक कामात व्यतीत होईल. विनाकारण शत्रूत्रास संभवतो. आर्थिक येणी येण्यास वेळ लागेल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थनी चंद्र आहे. त्याचा पंचम गुरुशी त्रिकोण योग आहे. हे ग्रहमान अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण होतील. मानसिक समाधान लाभेल. प्रवासाचे योग येतील. धनलाभ होईल. कुलदेवतेची प्रसन्नता लाभेल. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. हातून चांगली कामे होतील. वेळेचा सदुपयोग करा. विनाकारण इतरांच्या प्रश्नात लक्ष घालू नका. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नका.

-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. कल्पकता, चपळता, हुशारी हे गुण तुमच्यात उपजतच आहेत. तुम्ही निसर्गाशी सहज एकरूप होतात. जीवनाचा आनंद उपभोगतात. स्वभाव काहीसा शंकेखोर आहे. निर्णय घेण्यास उशीर लागतो. सामाजिक कामाची तुम्हाला आवड असली तरी जीवनात तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एकनैसर्गिक कलाकार असून स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाचे चटकन आकलन होते. तुमचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो. तुम्ही सभा गाजवू शकतात. तुम्हाला नातेवाईकांमुळे त्रास होऊ शकतो आणि एखाद्या आजारी माणसाची जबाबदारी तुमच्यावर पडते. तुम्ही सुखी, तेजस्वी , अहसवादी आणि ध्येयवादी आहात. तुमच्यात संशोधन करण्याची शक्ती आहे. तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास चांगला असतो. गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही नेतृत्व करणारे आहेत मात्र कल्पनाविलासात रमणे तुम्हाला जास्त आवडते. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्रतुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. मात्र तुम्हाला तसेच सहकार्य मिळेलच असे नाही. तुम्ही अत्यंत कल्पक, चपळ, उत्साही आणि कला प्रिय आहात. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. जीवनातला आनंद तुम्ही उपभोगत असतात. तुमचा स्वभाव काहीसा संशयी आहे आणि निर्णय घेण्यास तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही समाजाच्या सर्व थरामध्ये सहज मिसळू शकतात. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. बऱ्याच विषयाचे तुम्हाला चटकन आकलन होते. तुम्ही बुद्धिमान आहात आणि सभा संमेलना तुम्ही गाजवू शकतात. तुमची इच्छा शक्ती जबरदस्त आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत.  तुम्ही आशावादी असतात. कधी कधी तुम्ही अधिक काटकसरी आणि व्यवहारिक होतात. दुराग्रही स्वभाव, इतरांवर टीका करणे आणि त्यांचे दोष दाखवणे तुम्ही टाळले पाहजे.

व्यवसाय:-   जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.

शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या