असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २६ ऑगस्ट २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २६ ऑगस्ट २०२६
  • Positive News
  • ऑगस्ट 26 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २६ ऑगस्ट २०२६

*शुभ कालावधी*

सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.

सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.

सकाळी १०.३० ते सकाळी ११.३३ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.

सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३६  - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.

दुपारी १२.३६ ते दुपारी १.३९ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.

दुपारी १.३९ ते दुपारी २.४२ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  
 
दुपारी २.४२ ते दुपारी ३.४६ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 

दुपारी ३.४६ ते दुपारी ४.४९ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, पूर्वज, दानधर्म.

दुपारी ४.४९ ते संध्याकाळी ५.५२ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, तीर्थयात्रा, प्राणायाम, दैवी उपासना.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त

साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.

डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६

बारसे - १,३,५,१५,१६,३०

जावळ - ५,९,२६,२७,२८.  

गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०

२६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवी आणि शनी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनाने चंचल आहात. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. सहजपणे पैसे मिळतात. आपण चांगले दिसावे यांकडे तुमचा कटाक्ष असतो. पेमप्रकरणात समस्या निर्माण होतात. त्यावर मार्ग सापडत नाही. घरातील व्यक्ती आणि प्रिय जनांबद्दल खूप प्रेम असते. प्रेमळ असतात पण स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. तुमचे विचार विधायक आणि क्रियाशील असतात. हिप्नॉटिझम, गूढ विद्या यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही धाडसी, प्रभावी आणि बुद्धिमान आहात. संशोधन, ज्ञान याबद्दल तुम्हाला आवड आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड असते. उथळ संगीतापेक्षा गंभीर संगीत तुम्हाला आवडते. तुम्ही कडक शिस्तीचे भोक्ते आहात आणि कर्तबगार आहात. तुम्हाला शांतता आणि एकांत आवडतो. निसर्ग, फुले, रम्य देखावा, याची तुम्हाला ओढ असते. तुम्ही कधी कधी अति निराशावादी होतात. समाजापासून दूर राहणे पसंत करतात. भविष्याबद्दल तुम्हाला नेहमीच काळजी वाटत असते. तुम्ही अत्यंत धोरणी, हुशार आणि मुत्सद्दी आहात. तसेच महत्त्वाकांक्षी आणि दिर्घउद्योगी देखील आहात मात्र अति महत्त्वाकांक्षा असता कामा नये. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतात. तुमच्यामध्ये चिवटपणा आहे मात्र त्याचबरोबर संशय वृत्ती देखील असते. तुम्ही अधिकार गाजवणारे आहात. अनेकदा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला जातो. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल आपुलकी असते. तुम्ही न्याय प्रेमी आणि कायदा प्रेमी आहात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सतत अडचणी आणि विलंब यांचा अनुभव येतो. आपण इतरांवर अधिकार गाजवावा किंवा आपल्याला मानसन्मान मिळावेत असे तुम्हाला मनातून नेहमी वाटत असते. इतरांकडून काम करून घेण्यात तुम्हाला अडचण येतात. जीवनामध्ये खिन्नता येते. तुम्ही निराश विचारांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तुम्ही गर्विष्ठपणा आणि अहंकार टाळला पाहिजे. 

व्यवसाय:-  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, उच्च गणित, कोळसा, लाकूड, लोखंड, व्यवस्थापक, कंपनी सेक्रेटरी.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- निळा, जांभळा, काळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, मोती आणि हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६

श्रावण शुक्ल त्रयोदशी / सकाळी ८.०० नंतर चतुर्दशी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

"आज उत्तम दिवस आहे."

नक्षत्र - श्रवण.
राशी - मकर.

रवी षडाष्टक नेपच्यून.
चंद्र प्रतियुती गुरू.
चंद्र त्रिकोण शुक्र.
चंद्र लाभ शनी.

टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-
कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-शुक्र त्रिकोणामुळे आर्थिक लाभ आणि सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

वृषभ:-
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना यशस्वी होतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

मिथुन:-
आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. चंद्र-गुरू प्रतियुतीमुळे मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायातील नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.

कर्क:-
वैवाहिक आणि भागीदारीच्या क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चा यशस्वी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन करार लाभदायक ठरू शकतात.

सिंह:-
कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.

कन्या:-
मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-शुक्र योगामुळे आनंददायी घटना घडतील. नवीन संपर्क भविष्यात लाभदायक ठरतील. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तुळ:-
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल. चंद्र-शनीच्या प्रभावामुळे मेहनतीचे चांगले फळ मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

वृश्चिक:-
पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. संवादातून महत्त्वाची कामे साध्य होतील.

धनु:-
आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन खरेदीचा योग संभवतो. बोलण्यातून महत्त्वाची कामे साध्य होतील. घरातील वातावरण आनंदी राहील.

मकर:-
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. चंद्र-शुक्र त्रिकोण आणि चंद्र-शनी लाभ योगामुळे दिवस विशेष अनुकूल राहील. नवीन योजना आणि उपक्रम यशस्वी होतील. मान-सन्मान वाढेल.

कुंभ:-
खर्च वाढण्याची शक्यता आहे. मानसिक शांततेसाठी विश्रांती घेणे आवश्यक राहील. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. गुप्त लाभाची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.

मीन:-
मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

संबंधित बातम्या