. *शुभ कालावधी*
सकाळी ८.२१ ते सकाळी ९.२६ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी ११.३५ ते दुपारी १२.४० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी १२.४० ते दुपारी १.४५ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी १.४५ ते दुपारी २.४९ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी २.४९ ते दुपारी ३.५४ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी ३.५४ ते दुपारी ४.५९ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मनाने विशाल असून मानवी जीवनाची तुम्हाला उत्तम जण आहे. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात. तुम्हाला उच्च आध्यत्मिक अनुभूती प्राप्त होतात. तुम्ही भरपूर पैसे कमवतात. तुमचा स्वभाव नैसर्गिकपणे अस्वस्थ आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. तुम्हाला आदर मिळतो. तुंचायत प्रतिष्ठा, अधिकार, मोठेपणा आणि कल्पकता आहे. तुम्ही मनाने मोठे असून कृतीत मोकळेपणा आहे. तुम्ही व्यावहारिक प्रथांचा स्वीकार करतात पण लवकरच त्यास कंटाळून बंड करतात. तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे आहात. दूरवरच्या प्रदेशांबद्दल तुम्हाला आवड असल्याने तुमचा परदेश किंवा दूर देशाशी संबंध येतो.
व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, सुगंधी द्रव्य, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा आणि निळा.
शुभ रत्न:- पुष्कराज आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६
आषाढ कृष्ण नवमी / दुपारी ४.३७ नंतर दशमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"संध्याकाळी ७.०० नंतर दिवस विशेष अनुकूल असून महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन निर्णय घेण्यासाठी शुभ वेळ आहे."
नक्षत्र - कृतिका / संध्याकाळी ६.४३ नंतर रोहिणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.
रवी त्रिकोण शनी.
चंद्र लाभ गुरू.
चंद्र त्रिकोण शुक्र.
चंद्र युती हर्षल.
चंद्र लाभ नेपच्यून.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
संध्याकाळी ७ नंतर महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
राशीस्थानी चंद्रामुळे मन प्रसन्न राहील. चंद्र-गुरू आणि चंद्र-शुक्राच्या शुभ योगामुळे आर्थिक लाभ, मान-सन्मान आणि कौटुंबिक सुख मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होईल. प्रवास लाभदायक ठरेल.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
रवी-शनी त्रिकोण योगामुळे नियोजनबद्ध कामात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. घरगुती कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
बोलण्यात संयम ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात अपेक्षित यश मिळेल.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामातील अडचणी दूर होतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
चंद्र-हर्षल योगामुळे नवीन कल्पना सुचतील. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. मानसिक उत्साह वाढेल.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र-नेपच्यून शुभ योगामुळे सर्जनशील कार्यात प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. दिवस आनंददायी आणि समाधानकारक जाईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521