असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १५ मे
गुरुवार, १५ मे २०२५. वैशाख कृष्ण तृतीया. विश्वावसु नाम सनावत्सर, उत्तरायण, वसंत ऋतू, शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज वर्ज्य दिवस आहे"
नक्षत्र - ज्येष्ठ/मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक/ (दुपारी २.०८ नंतर) धनु. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा रवी, गुरू, शनि, नेपच्यूनशी अशुभ योग आहेत. शिवाय सकाळी अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका. मोठे करार आज नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील. राजकारणात प्रगती नाही.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मात्र मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. हाताची काळजी घ्या. नाती सांभाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या. शेअर्स मध्ये जोखीम नको. दत्त गुरूंची उपासना करा. दानधर्म कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज आनंदी दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. घरगुती कामे पूर्ण करावी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. नवीन खरेदी होईल. मात्र महत्वाचे निर्णय आज घेऊ नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल चंद्र आहे. कर्ज मंजूर होईल. सरकारी कामे रेंगाळतील. आध्यत्मिक लाभ होतील. पैशांची तजवीज होईल. मात्र परतफेड करताना त्रास होऊ शकतो.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नेहमीच ताठर भूमिका घेऊन चालत नाही. आज गोड बोलून कामे होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज फारशी अनुकूलता नाही. औदार्य दाखवाल. महिलां सहकारी कडून कामे करताना तारतम्य बाळगावे लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. हाडांचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सरकारी कामात दिरंगाई होऊ शकते. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घर आणि व्यवसाय यात ओढाताण होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नववा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521