असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य ८ जून
आजचे राशीभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या बाळाची तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचे वैशिष्ट्ये:-
रविवार, ८ जून २०२५. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे" प्रदोष
चंद्रनक्षत्र - स्वाती/विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. (परीघ योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा सुर्याशी अशुभ योग आहे. मोठी जोखीम टाळा. सरकारी कायदे पालन कटाक्षाने करा. अहंकार नको. व्यसने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. सन्मान मिळेल मात्र त्यासाठी अधिक खर्च होईल. मन आनंदी राहील. कामात काही बदल संभवतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. व्यापार वाढेल. भरभराट होईल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वेगळ्या वाटेने जाल. गृह सजावट कराल. शेतीतून लाभ होतील. पित्याशी मतभेद संभवतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. मात्र महत्वाच्या व्यक्तीकडून दुर्लक्ष होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. शत्रू त्रास जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्या राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. स्वप्ने साकार होतील. आरोग्याचे प्रश्न मात्र निर्माण होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. विवेकबुद्धीचा वापर कराल. काही सुखद अनुभव येतील. लवकरच अनुकूलता वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. कायदा क्षेत्रातील लोकांना मोठ्या संधी चालून येतील. दुरावा कमी होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. धन संपत्ती वाढेल. नवीन संधी चालून येतील. राजकारणात मात्र निराशा होऊ शकते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. गृह काळ टाळा. सामाजिक कामातून विनाकारण पश्चाताप होऊ शकतो.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागू नका.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
८ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी उशीराने घडतात. शिस्त, गांभीर्य, कर्तव्य याची जाणीव तुम्हाला प्रामुख्याने असते. तुम्ही सखोल विचार करणारे आणि स्थिर मनाच्या आहात. तुम्ही समतोल वृत्तीने सर्वत्र बघतात. कोणत्याही प्रश्नांची दुसरी बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याबद्दल इतर लोकांचे बरेच गैरसमज असतात. तुम्ही तुमच्या कामामध्ये सतत मग्न असतात. तुम्ही धोरणी आणि चतुर आहात. निसर्ग, संगीत, सौंदर्य यांचे तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या अधिकारांची तुम्हाला जाणीव असते. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही उत्तम व्यवस्थापन करू शकतात. तुम्ही न्याय प्रेमी, कायदा प्रेमी आहात. तुमच्या आर्थिक नियोजन काटेकोर असते. तुम्ही इतरांना योग्य वेळी मदत करतात. तुम्ही दीर्घोद्योगी आहात आणि तुम्हाला आयुष्यात उशिरा यश मिळते मात्र ते बराच काळ टिकते.
व्यवसाय:- सर्वप्रकारची शास्त्र, स्टॅटिस्टिक्स, अवघड गणित, संशोधन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, अकाउंट, पॅथॉलॉजी, वकील.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- गडद निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू, काळा मोती. अमेथिस्ट, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521