असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २२ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २२ जून
  • Positive News
  • जून 22 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २२ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये:-  

रविवार, २२ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण द्वादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ४:३० ते संध्याकाळी ६.००

"आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस आहे"  भगवंत एकादशी रवी आर्द्रा नक्षत्रात.

नक्षत्र: भरणी/कृतिका. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष/(रात्री ११.०४ नंतर) वृषभ.  

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी शुभ योग आहे. चंद्र तुमच्याच राशीत आहे. प्रणयरम्य दिवस आहे. वातावरणाचा आनंद घ्याल. सहल घडेल. भौतिक सुखे प्राप्त होतील. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)  चैनीसाठी खर्च कराल. कलाकारांना मेहनताना मिळण्यासाठी उशीर होईल. वाहन सुख मिळेल. एखादा वेगळाच निर्णय घ्याल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल चंद्र आणि प्रसन्न ग्रहमान आहे. नवीन खरेदी होईल. भेटवस्तू मिळतील. आवडते पदार्थ चाखाल. पराक्रम गाजवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. अचानक लाभ होतील. 
 
सिंह:- (मा, मी, मु मे, मो, टा, टी, टू, टे) नेतृत्व गाजेल. कलाकारांना उत्तम यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. भागीदारीतून लाभ होतील.
  
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) अष्टमस्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. आर्थिक आवक वाढेल. मात्र सावधपणे वाटचाल करा. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. गायन -वादन यापासून आनंद मिळेल. शेती उत्पादन वाढेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रगतीची घोडदौड चालूच राहील. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. दुर्बल व्यक्तीसोबत न्याय कराल. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक लाभाचे योग आहेत. लॉटरीमधून यश मिळू शकते. छोटे प्रवास घडतील. संवाद सकारात्मक होतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जमीन व्यवहारातून यश मिळेल. शेतीतून फेरफटका होईल. अन्नधान्य वाढेल. शेजाऱ्यांशी सामोपचाराने चर्चा होईल. वाहन जपून चालवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभासाठी चांगला दिवस आहे. तुम्ही बुद्धिमान आहात पण व्यवहारी नाही. आज पाठपुरावा करा. येणी येतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. छोटी सहल होईल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमचा अंदाज अचूक येईल. नियोजनाप्रमाणे कामे होतील. धार्मिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. सौख्य लाभेल.

२२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर हर्षल, शुक्र आणि बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. बोलके डोळे आणि उत्तम शरीरयष्टी हे तुम्हाला वरदान आहे. स्वभाव अस्थिर असतो. अनपेक्षित निर्णय घेतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून तुम्हाला फायदा होतो. मित्र परिवार मोजका असतो. तुम्ही रुबाबदार आहात. आयुष्यातील 40 ते 61 हा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो. जीवनाचा पूर्वार्ध कष्टात जातो मात्र उत्तरार्ध आनंदात व्यतीत करतात. अनेकदा तुमच्या वागण्यात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला अनेक विलक्षण आणि अनपेक्षित घटनांचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती आणि तल्लख पणा आहे. तुमची विचारसरणी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे. तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. हातात घेतलेल्या कार्यात तुम्ही पूर्वनियोजन करून उत्तम यश मिळवतात. तुम्हाला नाविन्याची आणि प्रवासाची आवड आहे. आपल्या आयुष्यात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटत राहते त्यामुळे तुमचे घर, नोकरी आणि मित्रपरिवार देखील बदलत राहतो.  तुमच्या वागण्या मध्ये एक ठामपणा आहे. तुम्हाला तुमच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात.

व्यवसाय:-  जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, बँकिंग, आयात-निर्यात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कान नाक डोळे तज्ञ, संशोधन.

शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, रविवार.

शुभ रंग:- निळा, पांढरा, जांभळा. 

शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या