असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २० जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २० जून
  • Positive News
  • जून 20 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य २० जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-

शुक्रवार, २० जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण नवमी/दशमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१, वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

आज उत्तम दिवस आहे. 

चंद्रनक्षत्र - रेवती.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन/ (रात्री ९.४५ नंतर) मेष.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

शेअर्स:- वृषभ, मिथुन, धनु राशीच्या लोकांनी लॉंग टर्म मध्ये तर मीन राशीच्या लोकांनी शॉर्ट टर्म मध्ये व्यवहार करावेत. मकर राशीच्या लोकांनी शॉर्ट टर्म व्यवहार टाळावे.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रात्री चंद्राचा बुधाशी केंद्र योग्य आहे. संमिश्र दिवस आहे. सुरुवात संथ होणार आहे. चैनीसाठी खर्च कराल. प्रवास घडतील.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 
अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येईल. दबदबा वाढेल. अधिकारात बदल होईल. मार्ट अति घाई टाळावी.
  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाचा धडाका वाढेल. भविष्याचा उत्तम वेध घ्याल. नवीन संकल्प कराल. अचानक एखादा खर्च वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रवास करते लागतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. आयात - निर्यात यातून लाभ होतील. अध्यात्मिक लाभ होतील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सावकाश वाटचाल करा. मोठी जोखीम नको. उत्तरार्धात आर्थिक प्रगती जोमाने होणार आहे.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करून घ्या. कुलदेवतेचे दर्शन घ्याल. उत्तम अनुभव येतील. मन पवित्र आनंदाने भारून जाईल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. प्रगतीचा वेग वाढेल. एखादे संकट टळेल. मात्र काळजीपूर्वक पावले टाका. नोकरीत भ्रमंती करावी लागेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कोर्ट कामात यश मिळेल. शत्रूचा त्रास जाणवेल. हरवलेल्या वस्तू सापडतील. दूरचा प्रवास घडेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक दृष्टीने चांगला कालावधी आहे. समाधानकारक घटना घडतील. प्रगती होईल. पशु लाभ होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम ग्रहमान आहे. त्याचा आज आनंद घ्या. आवडत्या ठिकाणी जाणे घडेल. दबदबा वाढेल. भावंड मदत करतील.      

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामान्य दिवस आहे. सरासरी प्रमाणे लाभ होतील. वक्तृत्व बहरेल. सामाजीक वजन वाढेल. विनाकारण इतरांकडून त्रास होऊ शकतो.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. छोटे प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल.

ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

२० जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय पाणथळ जागेजवळ होतो. विवाहानंतर अधिक प्रगती होते. मित्रपरिवार मोठा असतो. लेखनाची आवड  असते. वक्तृत्व उत्तम असते. बोलण्याने छाप पडते. भाषण देण्यात यशस्वी होतात. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये अधिक लोकप्रिय असतात. तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. तुमचे स्वतंत्र विचार असले तरी इतरांचा तुम्ही सन्मान करतात. मान-मरातब, कौतुक, प्रतिष्ठा याची तुम्हाला मनातून आवड आहे. दुरबला लोकांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. नवनवीन गोष्टी विकत घेणे, नवीन काहीतरी करून पाहणे तसेच प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि लोकप्रिय आहात. इतरांना तुमचा सहवास आवडतो. इतरांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले काय आणि वाईट काय याची तुम्हाला जाण आहे. तुम्ही मोठमोठाले प्रकल्प प्रत्यक्षात आणू शकतात. स्वतःच्या कामात व्यस्त असणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात. आणि कायदा प्रेमी आहात. तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.

व्यवसाय:-  लेखक, वक्ता, राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, अकाउंट्स, मॉल, चार्टर्ड अकाउंटंट.

शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, जांभळा, पिवळा.

शुभ रत्न:- मोती, हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.
 

संबंधित बातम्या