असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज वाढदिवस असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
सोमवार, २ जून २०२५. ज्येष्ठ शुक्ल सप्तमी. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज उत्तम दिवस आहे"
चंद्रनक्षत्र - मघा/पूर्वा आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (व्याघात योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. सौख्य लाभेल. सरकारी पदे मिळतील. सखोल अभ्यास कराल. मात्र संतती शी वागताना सावधपणे अंदाज घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. अचानक आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास घडतील. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. कुलदेवतेची उपासना करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. उधारी टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यय स्थानी चंद्र आहे. अचानक एखादा लाभ होऊ शकतो. तरीही महत्वाची कामे शक्यतो आज नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र अनुकूल आहे. लाभ होतील. गूढ बाबीचे आकर्षण वाटेल. सत्पुरुषाचे सन्निध्या लाभेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. स्पर्धेत यश मिळेल. काही बाबतीत सौख्य लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. स्वजनाचा विरोध मावळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद लाभतील. ऐश्वर्य लाभेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. जुने वाद उकरून काढले जातील. संयमाची भूमिका घ्या. खर्च वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तम स्थानी चंद्र आणि केतू आहे. शत्रूच्या हातात विनाकारण कोलीत देऊ नका. तुमच्या राशीतील राहू आत्मविश्वास वाढवेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल ग्रहमान आहे. इतरांचे सहकार्य लाभेल. प्रलोभने सामोरे येतील. मात्र त्यापासून दूर रहा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रगल्भ आहात. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्याकडे दिलेले काम तुम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात. तुमचे स्वतंत्र विचार असले तरी इतरांचा तुम्ही सन्मान करतात. मान-मरातब, कौतुक, प्रतिष्ठा याची तुम्हाला मनातून आवड आहे. तुम्ही लोकांमध्ये मिसळतात. नवनवीन गोष्टी विकत घेणे, नवीन काहीतरी करून पाहणे तसेच प्रवास यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि लोकप्रिय आहात. इतरांना तुमचा सहवास आवडतो. इतरांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. चांगले काय आणि वाईट काय याची तुम्हाला जाणा आहे. तुम्ही मोठमोठाले प्रकल्प प्रत्यक्षात आणू शकतात. स्वतःच्या कामात व्यस्त असणे तुम्हाला आवडते. तुम्ही नम्र आहात. आणि कायदा प्रेमी आहात. तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, अकाउंट्स, मॉल, चार्टर्ड अकाउंटंट.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा.
शुभ रत्न:- मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521