असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १९ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १९ जून
  • Positive News
  • जून 19 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य १९ जून

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांची वैशिष्ट्ये:-

गुरूवार, १९ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण अष्टमी/नवमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

"आज उत्तम दिवस आहे" 

चंद्र नक्षत्र - उ. भा./ रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी -  मीन.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राची शनि, नेपच्यूनशी युती, गुरुशी केंद्र योग आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल कालावधी आहे. गूढ उलगडत जातील. जुनाट वस्तूंच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. 

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होइल. आज कर्जे फेडून टाकावीत. पाण्याकवल भाग्योदय होईल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. नोकरीच्या जागी उत्तम अनुभव येतील. मनाची द्विथा अवस्था होईल. योग्य सल्ला घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) काही सुखद अनुभव येतील. धार्मिक व्यक्तींचा सत्संग लाभेल. सखोल संशोधन करण्यास चांगला अवधी आहे. तीर्थयात्रा घडेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. स्त्री धन वाढेल. उद्योग/व्यवसायात भरभराट होईल. जमीन व्यवहारातून यश मिळेल. पाण्यापासून सावध रहा.
   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सप्तम स्थानी चंद्र आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक होतील. येणी वसूल होतील. दीर्घकालीन शेअर्स मधून लाभ होतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  संमिश्र दिवस आहे. व्यावसायिक लाभ होतील. द्रव पदार्थ क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. वाहन सांभाळून चालवा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जवळचे प्रवास घडतील. संधी चालून येतील. कोर्ट कामात यश मिळेल. संततीची नाराजी जाणवेल. शेअर्स मधून नुकसान संभवते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. स्थावर संपत्ती वाढेल. सौख्य लाभेल. पूर्वजांचे आशीर्वाद फळास येतील. गुप्तशत्रू पराभूत होतील. घरगुती कामास वेळ दयावा लागेल. 
    
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमान आहे. आज कामे पूर्ण होतील. मित्रांचा सल्ला अचूक ठरेल. ज्यांना नोकरी पाहिजे आहे त्यांनी आज जोरदार प्रयत्ने करावेत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उधारी वसूल होईल. आर्थिक चिंता मिटतील. नफा वाढेल. कौटुंबिक वातावरण काहीसे अस्वस्थ राहील.
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायातून लाभ मिळतील. मेजवानी मिळेल. कामाचा वेग वाढेल. मात्र फार मोठे निर्णय आज घेऊ नका. घर खरेदीसाठी योग्य कालावधी नाही.   

१९ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जन्म प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यात होतो. एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात खंड पडू शकतो. मात्र तुमचा स्वभाव संशोधन करण्याचा आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला शास्त्राची आवड आहे. तुम्ही आक्रमक आणि तापट आहात. अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. खेळण्याची हौस आहे. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला आवड आहे. तुम्ही जे कार्य हातात घेतात त्यात तुम्हाला यश मिळते कारण तुमचे नियोजन चांगले असते. तुम्हाला गूढ विद्यांची देखील आवड आहे. तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. सौंदर्याबद्दल तुम्हाला नैसर्गिक आकर्षण आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही गर्दीमध्ये लोकप्रिय असतात. नीती आणि आणि अनीती याबद्दल तुमच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. तुम्ही सतत उद्योग मग्न असतात. उद्योग प्रिय आहात. तुम्ही कायम उत्साह मूर्ती असतात. इतरांचा तुम्ही आदर करतात. इतरांना तुम्ही तणावापासून मुक्त करतात. तुम्ही फार सखोल अभ्यास करणारे जरी नसले तरी तुमचे वक्तृत्व चांगले असते. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुम्ही संशोधक असाल आणि त्याचा जगाला कसा फायदा होईल याचा विचार करतात. तुम्ही जसे व्यवहारी आहात तसे दानधर्म करणारे देखील आहात.

व्यवसाय:-  जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, चित्रपट निर्माते, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, इंटेरियर डिझायनर, दिग्दर्शक, बँकिंग, औषधाचे दुकान, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, वकिली.

शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, हिरवा.

शुभ रत्न:- पाचू, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)
 

संबंधित बातम्या