असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १६ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
सोमवार, १६ जून २०२५, ज्येष्ठ कृष्ण पंचमी/षष्ठी. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/(दुपारी १.१० नंतर) कुंभ. (वैधरुती योग शांती)
"आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे."
मेष:- चंद्राचा रवी, गुरुशी शुभयोग् आहे तर मंगळ आणि हर्षलशी अशुभ योग आहे. तुमचा दबदबा वाढेल. अधिकार वाढतील. स्वप्ने साकार होतील. कोणतेही व्यसन वाईटच!
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रांच्या भेटी गाठी होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. सामाजिक कार्यातून कटू अनुभव येऊ शकतो.
मिथुन:- सुरुवात फारशी चांगली नसली तरी दुपारनंतर अनुकूल ग्रहमान आहे. सिद्धी प्राप्त होतील. मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. सत्संग लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
कर्क:- दुपारनंतर अष्टम स्थानी चंद्र आहे. त्याचा हर्षलशी केंद्र योग आहे. फारशी अनुकूलता नाही. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही. आरोग्य सांभाळा.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. मोठी झेप घ्याल. व्यवसाय वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. शत्रू पराभूत होतील. मात्र नोकरीत काही कटकटी जाणवतील.
कन्या:- चांगली बातमी समजेल. नोकरी/व्यवसायात यश मिळेल. अधिकार वाढतील. भरभराट होईल. सकाळी प्रवास करणार असल्यास श्री. गणेश पूजन करून निघावे.
तुळ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सुखद अनुभव येतील. छोटे प्रवास घडतील. घरगुती समारंभ होईल.
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्र भेटतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. जमीन/शेती यातून लाभ होतील.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. नात्यातून सहकार्य मिळेल. दिवस अधिक लाभाचा आहे. मन प्रसन्न राहील. आरोग्य सांभाळा. पत्नीची मोलाची साथ लाभेल.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. संततीची काळजी घ्या. शेअर्स मध्ये जोखीम नको.
कुंभ:- दुपार नंतर तुमच्याच राशीत चंद्र आहे. देवभक्ती वाढेल. विद्या प्राप्त होतील. उपासना लाभदायक ठरेल. शत्रुत्व घेऊ नका. कोर्टात अपयश संभवते. घरातील अग्नी संबंधित वस्तूंची काळजी घ्या.
मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वही कामे सकाळी पूर्ण करून घ्या. सामाजिक कार्यातून उत्तम लाभ होतील. नवीन ओळखी होतील.
१६ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही मिश्किल स्वभावाचेआहात. इतरांची ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र आहात. सदैव सावध असतात. मात्र तुम्हाला सतत नैराश्य अनुभवला येते. त्यामुळे अस्वस्थता वाढते. एकाच वेळेत तुम्ही स्वतःला बलवान आणि कमकुवत समजतात. अंगात भित्रेपणा असतो. तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी आहे आणि त्याचा व्यवहारात चांगला उपयोग होतो. तुमच्या महत्वाकांक्षा अतिशय वरच्या पातळीचे असतात. तुम्हाला परंपरा फारशा आवडत नाहीत. क्रीडा, भ्रमंती, प्रवास, गिर्यारोहण याची तुम्हाला आवड असते. इतरांना स्वतःचे विचार तुम्ही उत्तम पणे समजावून सांगतात. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते आणि तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी संबंध येतो. तुम्ही तुमच्या पेक्षा वरिष्ठ वर्तुळात वावरतात. सर्वसामान्य माणसाबद्दल तुम्हाला फारशी आवड नसते. आवडते पुस्तक वाचण्यात तुमचा बराच वेळ जातो. तुम्हाला स्वतःच्या कर्तव्यांची आणि अधिकाराची जाणीव आहे. तुमचा स्वभाव थोडा संशयी आहे. तुम्हाला अहंकार असतो. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन मात्र विशाल आहे. तुमच्यात व्यापारी वृत्ती आहे. तुमच्या वागण्यात मुक्तपणा असतो. मात्र इतरांना तुमच्यापासून स्फूर्ती मिळते. बुद्धिजीवी आयुष्य तुम्हाला आवडते. रहस्यकथा, विनोदी चित्रपट आवडतात. तुम्हाला चांगली संतती लाभते. इतरांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात.
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, आयात-निर्यात, वैद्यकीय क्षेत्र, गणित.
शुभ दिवस:- सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, इंद्रनील, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)