असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १४ जून
आज जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्य आणि शेवटी आजचे राशिभविष्य:-
१४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचेव्यक्तिमत्व देखणे असते. तुम्ही सहसा इतरांना दुखावत नाहीत. उलट उत्तम सहकार्य करतात. निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्ही चाणाक्ष आहात.कोडी सोडवणे, लॉटरी, शेअर्स यांची आवड असते. तुम्ही स्त्री असल्यास प्रसूतीवेळी त्रास होऊ शकतो. मात्र वैवाहिक जीवन सुखी असते. स्वतःच्या व्यवसायात चांगले यश मिळते. तुमच्या भावना तुम्ही नियंत्रणात ठेवू शकतात. विवाह नंतर भाग्योदय होतो. तुम्ही बुद्धिमान आहात, चिकित्सक आणि संशोधन करणारे आहात. तुमच्यात व्यापारी वृत्ती असून तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमच्यामध्ये धूर्तपणा देखील आहे. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. आणि त्याचा तुम्ही व्यवहारात वापर करतात. तुम्ही मनाने उदार आहात. इतरांचा सन्मान करतात. तुम्ही कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. स्वतःचे विचार तुम्ही इतरांना समजून सांगू शकतात. आपलं उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला पक्कं माहीत असतं. तुम्ही उच्च दर्जाच्या वस्तू वापरतात. यात वाहन, दागिने, सुगंधी द्रव्य यांचा समावेश आहे. तुम्हाला समाजात मिसळणे आवडते. तुम्ही विविध समारंभांमध्ये हौसेने भाग घेतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल आहे. तुम्हाला धर्म, आणि तत्त्वज्ञान याची आवड आहे. प्रवास करणे तुम्हाला आवडते.
व्यवसाय:- बँकिंग, मेडिकल, प्रयोगशाळा उपकरणे, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, क्रीडा, वकील, शाब्दिक खल करणाऱ्या व्यवसाय, कारखाना, गृह सजावट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
शनिवार, १४ जून २०२५, ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे" संकष्टी चतुर्थी चंद्रोदय - मुंबई : १०.०२, नाशिक :१०.००
नक्षत्र: उ.षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनी, नेपच्यून आणि हर्षलशी शुभ योगआहे. अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम लाभ होतील. अचानक एखादी चांगली बातमी समजेल. मौल्यवान खरेदी होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) प्रवासातून लाभ होतील. सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. आनंद दायक अनुभव येतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अचानक एखादी सुखद घटना घडेल. खरेदी होईल. प्रवास घडतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. लाभाची घटना घडेल. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक भरभराट चांगली होणार आहे. व्यवसाय वाढेल. व्यापार वृद्धिंगत होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. जेवढे अधिक काम कराल तेव्हडे लाभ वाढतील. मित्र मंडळी भेटतील. शत्रू पराभूत होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. मनासारखी कामे होतील. जमीन व्यवहारातून यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती साध्य होईल. धन -धान्य आणि संपत्ती वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) द्वितीय चंद्र आहे. अनपेक्षित लाभ होतील. आरोग्य सुधारेल. सुखकारक बातमी समजेल. खरेदी होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आनंदी राहाल. मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. हर्षल शी शुभ योग येऊ. अचानक लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. घरगुती कामात वेळ द्यावा लागेल. अपेक्षित मोबदला मिळणार नाही. संयम बाळगावा लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. अडचणी दूर होतील. नात्यातून लाभ होतील. प्रश्न मार्गी लागतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)