असा असेल तुमचा आजचा दिवस : मंगळवार, २३ जून २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : मंगळवार, २३ जून २०२६
  • Positive News
  • जून 23 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : मंगळवार, २३ जून २०२६

निज ज्येष्ठ शुक्ल नवमी / (दुपारी ४.४० नंतर दशमी) ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज चांगला दिवस आहे."

 चंद्रनक्षत्र - हस्त / सकाळी ११.५४ नंतर चित्रा.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. 

 चंद्र केंद्र बुध.

 टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र-बुध योगामुळे संवाद कौशल्य प्रभावी ठरेल. नवीन योजना यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. महत्त्वाचे व्यवहार पूर्ण होतील. बोलण्यातील गोडवा लाभदायक ठरेल. नवीन खरेदीचा योग संभवतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) राशीस्वामी बुधाच्या प्रभावामुळे बौद्धिक कार्यात यश मिळेल. शिक्षण, लेखन आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. दिवस उत्साहवर्धक राहील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर द्या. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही जुने प्रश्न मार्गी लागतील. संयम लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) लाभस्थानी ग्रहप्रभाव असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. चंद्र-बुध केंद्र योगामुळे निर्णयक्षमता चांगली राहील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मानसिक शांततेसाठी विश्रांतीची गरज भासेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक विषयात रुची वाढेल. गुप्त लाभाची शक्यता आहे. संयमाने वागा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. नवीन योजना यशस्वी होतील. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मान-सन्मान वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन योजना लाभदायक ठरतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च संभवतो. संशोधन आणि तांत्रिक कामात यश मिळेल. मानसिक स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करा.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) वैवाहिक आणि भागीदारीच्या क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. सामाजिक संबंध दृढ होतील.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 8087520521

संबंधित बातम्या