असा असेल तुमचा आजचा दिवस  २२ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

असा असेल तुमचा आजचा दिवस  २२ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
  • Positive News
  • सप्टेंबर 22 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  २२ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

     तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी चांगली आहे. डोळे बोलके असतात. भिन्न लिंगी व्यक्तीपासून फायदा होतो. मित्र परिवार कमी असतो. वाद विवाद झाल्यास त्याची तुम्ही फिकीर करत नाहीत. स्वतःचा व्यवसाय केल्यास यश मिळते. स्वभाव काहिस अस्थिर असू शकतो. आयुष्यच्या उत्तरार्धात मोठे यश मिळते. 

    तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो.

व्यवसाय:-  जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, राजदूत, बँकिंग, आयात निर्यात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डॉक्टर, कान -नाक- डोळे स्पेशालिस्ट, संशोधन, ज्योतिष.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.

शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.

शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या* *कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल एकादशी. वर्षा ऋतू. पराभव नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे." *परिवर्तीनी एकादशी*.

नक्षत्र - उ. षा / सकाळी ७.०७ नंतर श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.

चंद्र केंद्र शुक्र, चंद्र लाभ शनी, चंद्र त्रिकोण हर्षल.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ ग्रहमान आहे. व्यवसायात प्रगती होईल. अचानक लाभ होऊ शकतात. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मान मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मनासारख्या घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सहकार्य मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. महिलांकडून सहकार्य मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) लाभदायक दिवस आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. अनपेक्षित लाभ होऊ शकतात. प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सौख्य देणारा दिवस आहे. घरगुती कामात लक्ष द्याल. गृहसजावटीच्या कामांना वेळ द्याल. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्रामुळे धैर्य वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहारातून लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. लाभदायक संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनाप्रमाणे काही घटना घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र असल्याने खर्च वाढू शकतो. घरगुती कामात वेळ जाईल. अनावश्यक खर्च टाळा. मोठे निर्णय घेताना सावध राहा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभदायक दिवस आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अपेक्षित संधी चालून येईल. आर्थिक लाभ होतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी होऊ शकते.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या