असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ३ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ३ जून
  • Positive News
  • जून 3 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ३ जून

आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज वाढदिवस असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:- 

मंगळवार, ३ जून २०२५. ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ -  दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे." दुर्गाष्टमी

चंद्र नक्षत्र - पूर्वा (फाल्गुना). आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (हर्षण योग, विष्टी करणं शांती) 
 
मेष:- चंद्राचा रवी आणि बुधाशी केंद्र योग आहे. फारसी अनुकूलता नाही. प्रापंचिक सुख मिळेल. दबदबा वाढेल. संततीची काळजी घ्या. 
     
वृषभ:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रसंगी कठोर बोलावे लागेल. शब्दास मान द्यावा लागेल. विनाकारण मन अस्वस्थ राहील.
 
मिथुन:- तृतीय स्थानी चंद्र आहे. भावंड मदत करतील. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. दानधर्म करावा लागेल.

कर्क:- कौटुंबिक सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. खरेदी होईल. मित्र मंडळी भेटतील. प्रवासाचे नियोजन बदलेल.
 
सिंह:- चंद्र तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. यश मिळेल. मात्र अहंकार टाळावा लागेल. वरिष्ठ नाखूष होतील.
  
कन्या:- आज अनुकूल दिवस नाहीये. दिरंगाई अनुभवाल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. प्रवासाचे नियोजन चुकेल. 
 
तुळ:- लाभ स्थानी चंद्र आहे.  सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. चांगली बातमी समजेल. मात्र चुकीचे कर्म टाळा.
 
वृश्चिक:- दशम चंद्र कामाच्या ठिकाणी उत्साह वाढवेन. मौल्यवान खरेदी होईल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. कोर्टात मात्र निराशा होईल.  

धनु:- आज फारशी अनुकूलता नाही. काही विशेष घटना घडतील. कोर्ट कामात प्रगती होईल. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.
 
मकर:- संमिश्र कालावधी आहे. धनलाभ होईल. मात्र इतर बाबतीत फारशी अनुकूलता नाही. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या.   
 
कुंभ:- सप्तम चंद्र आहे. घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. येणी वसूल होतील. गुप्त शत्रूचा त्रास मात्र वाढेल. इतरांच्या वादात पडू नका.
 
मीन:- व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे स्पर्धक मात्र त्रास देऊ शकतात. राजकीय भाष्य टाळा.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

३ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकारची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात. तुम्ही उत्तम सल्लागार आहात.

व्यवसाय:-  राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या