असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ६ जून

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ६ जून
  • Positive News
  • जून 6 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य ६ जून

आजचे राशिभविष्य आणि शेवटी  आज जन्मलेल्या तसेच आज जायचं वाढदिवस आहे त्यांची वैशिष्टये:-

शुक्रवार, ६ जून २०२५. ज्येष्ठ शुक्ल एकादशी. उत्तरायण, शके १९४७, संवत २०८१. सौर ग्रीष्म ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  सकाळी १०.३० ते दुपारी १२.००.

आज दुपारी ३.०० नंतर अशुभ आहे. *निर्जला (स्मार्त) एकादशी.

चंद्रनक्षत्र - हस्त/चित्रा आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या/तुळ. (व्यतिपात योगाची आणि विष्टी करणं शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळाशी लाभ योग तर बुधाशी त्रिकोण योग होतो आहे. हे दोन्हीही योग शुभ आहेत. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल. मौल्यवान वस्तूची खरेदी होईल. कोर्ट कामात यश लाभेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ व्यक्तीचे सहकार्य मिळेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) छोटे प्रवास घडतील. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. भाऊ मदत करतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मनासारखी कामे पार पडतील. स्वप्ने साकार होतील. पशु लाभ होतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडचणी दूर होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कुलदेवतेची कृपा राहील.  चांगले अनुभव येतील. अधिकर वाढतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. बौद्धिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल.  
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र तुमच्याच राशीत येत आहे. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. मेजवानी मिळेल. प्रवासातून लाभ होतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुकूल ग्रहमान आहे. आज काही रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. संध्याकाळ खर्चात टाकणारी असू शकते.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र अनुकूल आहे. मन आनंदी राहील. कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. संगणक व्यवसायात उत्तम लाभ होतील.
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. वाहन जपून चालवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र अनुकूल होत आहे. उत्तम ग्रहमान आहे. व्यवसाय वाढेल. वादविवादात तुमचा विजय होईल. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. मन आनंदी राहील. मात्र महत्वाची कामे आज टाळावी लागतील. जुनाट व्याधींवर इलाज सापडेल.

-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

६ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक हुशार आणि बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेतून तुमचे आर्थिक प्राप्ती होते. अंतर्गत आवाजाचे तुम्हाला देणगी आहे. तुमचे असणे इतरांना आवडते. तुम्ही इतरांना सहजासहजी समजून येत नाहीत. रूढी, परंपरा यांची बंधने तुम्ही पाळत नाहीत. स्वतःबद्दल तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेतात. तुम्ही बोलण्यामध्ये अत्यंत चलाख आहात. जीवनात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक जाते. तुमचे कपडे उच्च दर्जाचे असतात. आणि तुम्ही सुगंधी द्रव्य वापरतात. तुमचा स्वभाव संशयी आहे.

व्यवसाय:-  संगीतकार, सराफ, व्यापार, हॉटेल मॅनेजमेंट, बेकरी, आर्किटेक्ट, मेडिकल दुकान, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- निळा.

शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
 
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
 

संबंधित बातम्या