असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, ५ मार्च २०२६.

 असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, ५ मार्च २०२६.
  • Positive News
  • मार्च 5 2026

Share on  

 असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य गुरुवार, ५ मार्च २०२६.

 फाल्गुन कृष्ण द्वितीया.
 उत्तरा नक्षत्र (सकाळी ८.१८ पर्यंत)/ नंतर हस्त
 चंद्र कन्या राशीत
 शूल योग शांती करून घेणे.
रवी ष चंद्र, 
रवी त्रिकोण गुरू, 
चंद्र केंद्र गुरू
संत तुकाराम महाराज बीज
आज शुभ दिवस आहे.


 मेष (Aries)
कामात बारकाईने लक्ष द्यावे लागेल. रवी–गुरू त्रिकोणामुळे वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. छोट्या प्रवासाचा योग.

 वृषभ (Taurus)
सर्जनशील कामात प्रगती. मुलांबाबत आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात सकारात्मक संवाद.

 मिथुन (Gemini)
घरगुती वातावरणात स्थैर्य. मालमत्ता किंवा दुरुस्तीचे काम होऊ शकते. आई-वडिलांचा आशीर्वाद लाभेल. मन प्रसन्न राहील.

 कर्क (Cancer)
संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक. भावंडांशी संबंध सुधारतील. नवीन कल्पनांना वाव मिळेल.

 सिंह (Leo)
आर्थिक बाबतीत प्रगती. रवी–गुरू योगामुळे प्रतिष्ठा वाढेल. नवीन उत्पन्नस्रोत मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.

 कन्या (Virgo)
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस. चंद्र–गुरू केंद्र योगामुळे मान-सन्मान वाढेल.

 तुळ (Libra)
मनात थोडी अस्वस्थता जाणवेल. आध्यात्मिक कार्यात मन रमवा. खर्च वाढू शकतो. ध्यान केल्यास मानसिक शांती लाभेल.

 वृश्चिक (Scorpio)
मित्रपरिवारातून लाभ. सामाजिक कार्यात सहभाग. अचानक आर्थिक संधी मिळू शकते. योजनांना यश मिळेल.

 धनु (Sagittarius)
करिअरमध्ये प्रगतीचा दिवस. वरिष्ठांकडून कौतुक. रवी–गुरू त्रिकोणामुळे भाग्याची साथ. नवीन जबाबदारी स्वीकाराल.

 मकर (Capricorn)
भाग्यस्थानी चंद्र लाभदायक. धार्मिक कार्यात सहभाग. प्रवासाचा योग. शिक्षण व संशोधनात यश.

 कुंभ (Aquarius)
अचानक खर्च संभवतो. आरोग्याकडे लक्ष द्या. गुप्त व्यवहार टाळा. संयम बाळगल्यास लाभ होईल.

 मीन (Pisces)
दाम्पत्य जीवनात आनंद. भागीदारीत यश. चंद्र–गुरू केंद्र योगामुळे आर्थिक सुधारणा. नवीन करारासाठी अनुकूल दिवस.

ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या