असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १६ मार्च २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १६ मार्च २०२६.
  • Positive News
  • मार्च 16 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य सोमवार, १६ मार्च २०२६.

फाल्गुन कृष्ण द्वादशी. शिशिर ऋतू. शके १९४७, संवत २०८२, विश्वावसुनाम संवत्सर.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

चंद्र नक्षत्र - धनिष्ठा.
चंद्र राशी - मकर / (संध्याकाळी ६.१४ नंतर) कुंभ.

आजचा विशेष योग - चंद्र केंद्र हर्षल योग.
सोमप्रदोष.

"सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे."

१६ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर चंद्र आणि नेपच्यून ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची कल्पनाशक्ती प्रचंड असते. तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावी असते. लोक तुमच्या बोलण्याकडे आणि विचारांकडे लक्ष देतात. तुमची बुद्धी चपळ असून नवीन कल्पना सुचण्याची क्षमता तुमच्यात भरपूर असते.

तुमचा स्वभाव काहीसा भावनाप्रधान असतो. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता तुमच्यात असते. त्यामुळे लोक तुम्हाला सल्ला विचारतात. तुमच्यात नेतृत्व गुण आणि नियोजन क्षमता उत्तम असते.

तुम्हाला प्रवास, संशोधन, नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड असते. जीवनात अनेक वेळा अचानक बदल घडतात. कधी मोठे यश तर कधी काही अडचणीही येतात. मात्र संकटांना सामोरे जाण्याची ताकद तुमच्यात असते.

तुमची विचारसरणी स्वतंत्र असते. तुम्हाला रूढी आणि बंधने फारशी आवडत नाहीत. तुमचे ध्येय मोठे असते आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता. आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक आणि सामाजिक प्रगती मिळते.

तुम्ही हट्टीपणा आणि भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. निर्णय घेताना शांतपणे विचार केल्यास तुम्हाला उत्तम यश मिळते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान असता.

व्यवसाय:-

संशोधन, अभियांत्रिकी, संगणक क्षेत्र, बँकिंग, संगीत, कला, ज्योतिष, मानसशास्त्र, शिक्षण, प्रशासन, उद्योग-व्यवसाय इत्यादी क्षेत्रात यश मिळू शकते.

शुभ दिवस:-

सोमवार, गुरुवार आणि शनिवार.

शुभ रंग:-

निळा, पांढरा आणि हिरवा.

शुभ रत्न:-

मोती, पाचू आणि नीलम.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा.)

राशिभविष्य

मेष:-

आज तुमच्या कामात वेग येईल. काही महत्वाची कामे सकाळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.

वृषभ:-

आजचा दिवस आनंद देणारा आहे. घरात काही शुभ चर्चा होतील. प्रवासाचे योग येऊ शकतात. नवीन योजना आखाल.

मिथुन:-

तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या चर्चेत किंवा बैठकीत तुमचा सल्ला महत्वाचा ठरेल. आर्थिक बाबतीत लाभ होईल.

कर्क:-

आज कामाच्या ठिकाणी व्यस्तता वाढेल. काही जबाबदाऱ्या वाढतील. मात्र तुमच्या प्रयत्नांमुळे चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांची कृपा मिळेल.

सिंह:-

आज तुमचे व्यक्तिमत्त्व विशेष उठून दिसेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान मिळेल.

कन्या:-

आज संशोधन, अभ्यास आणि नियोजन या कामात प्रगती होईल. काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमची चिकाटी यश देईल.

तुळ:-

आज काही खर्च संभवतात. घरासाठी नवीन वस्तू खरेदी होऊ शकते. मित्रांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल.

वृश्चिक:-

आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखादे महत्वाचे काम यशस्वी होईल. सरकारी कामात प्रगती होईल.

धनु:-

आज नवीन कामाची सुरुवात करण्याची इच्छा होईल. व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. प्रवासाचे योग संभवतात.

मकर:-

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावनिकता वाढेल. कामात थोडी व्यस्तता राहील. सकाळचा वेळ विशेष अनुकूल आहे.

कुंभ:-

संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. नवीन विचार सुचतील. मित्रांचा सहवास मिळेल.

मीन:-

आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. मात्र कामात लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या