असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २३ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २३ मे
  • Positive News
  • मे 23 2025

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २३ मे

शुक्रवार, २३ मे २०२५. वैशाख कृष्ण एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 

"आज उत्तम दिवस आहे"  अपरा एकादशी  

नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा. (दुपारी ४.०२ नंतर ) रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र त्रिकोण मंगळ आणि चंद्र युती शुक्र आहे. मात्र व्यय स्थानी चंद्र आहे. स्वतःच्या सुखासाठी खर्च कराल. राजकीय क्षेत्रात प्रभावी वाटचाल कराल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चंद्र अनुकूल आहे. आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल.  नोकरीत सुखद अनुभव येतील. वाहन सौख्य लाभेल. सुगंधी द्रव्यांचा वापर कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. तुमचा दबदबा वाढेल. कठोर निर्णय घ्याल. महिलांकडून लाभ होतील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू खरेदी होईल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रवासाचे योग आहेत. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश मिळेल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आज अनेक प्रलोभने सामोरे येतील. महिलांकडून लाभ होतील. व्यवसाय वाढेल. वरिष्ठ खुश राहतील.
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. अचानक लाभ होतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. मन आनंदी राहील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज घरगुती कामे पूर्ण करावीत. नवनवीन योजना पार पडतील. सन्मान मिळतील. नवीन वाहन/ मौल्यवान खरेदी होईल.
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात आर्थिक प्रगती साध्य होईल. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील. आज महत्वाची कामे पूर्ण करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या द्वितीय स्थानी चंद्र आहे. जमीन व्यवहारात यश मिळेल. वाहन सुख लाभेल. कलाकारांना अतिशय उत्तम दिवस आहे.
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. भौतिक प्रगतीस अनुकूल कालावधी आहे. 

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या