असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य २१ जून
आजचे राशिभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची वैशिष्ट्ये:-
शनिवार, २१ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण दशमी/एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज क्षय तिथी आहे" योगिनी (स्मार्त) एकादशी. दक्षिणायन प्रारंभ.
नक्षत्र: अश्विनी/भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळ, रवी, गुरुशी शुभ योग आहे. मन प्रसन्न राहील. अनुकूल ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडते छंद जोपासले जातील. आयुष्याचा नवीन अर्थ लागेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्यावा लागेल. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील. वडिलोपार्जित धन मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. अर्थकारण सुधारेल. प्रवासात आनंद मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. मनाची स्थिरता वाढेल. भावंडांकडून मदत मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक लाभ होतील. तुमच्या सहडबला मान मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल. दैवी शक्तीचा अनुभव येईल. हरवलेली वस्तू सापडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यसने/प्रलोभने टाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गुंतणुकीतून लाभ मिळतील. सामजिक कार्यात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यापार वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल. अनैतिकता सोडू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कर्तृत्व उजळून निघेल. व्यवसायिक यश मिळेल. कोर्ट कामात यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. धर्मकार्य घडेल.
ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
२१ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ आहात. उत्साह भरपूरआहे. प्रवासाची आवड आहे. वडिलोपार्जितसंपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. मुलांवर विशेष प्रेम असते. आपल्याला अज्ञातमीकलाभ व्हावेत आणि इतरांना आपण मदत करावी असे तुम्हाला नेहमी वाटते. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहेत. आयुष्यत तुम्हाला उशिराने प्रसिद्धी मिळते. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकाराची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)