असा असेल तुमचा आजचा दिवस : रविवार, २८ जून २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : रविवार, २८ जून २०२६
  • Positive News
  • जून 28 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : रविवार, २८ जून २०२६

निज ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००

"आज वर्ज्य दिवस आहे."
आज महत्त्वाची नवीन कामे शक्यतो टाळावीत.

 नक्षत्र - ज्येष्ठा.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.

 चंद्र त्रिकोण शनी.
 मंगळ लाभ गुरू.

टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

 मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
भाग्याची साथ लाभेल. मंगळ-गुरूच्या शुभ प्रभावामुळे नवीन ज्ञान आणि अनुभव प्राप्त होतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

 वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च संभवतात. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. चंद्र-शनी त्रिकोणामुळे संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

 मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील. सामाजिक संपर्क वाढतील. नवीन करार विचारपूर्वक करा.

 कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नियोजनबद्ध कार्यातून लाभ मिळेल.

 सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.

 कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. नवीन योजना पुढे ढकलणे योग्य ठरेल.

 तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळा.

 वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शनी त्रिकोणामुळे नियोजनबद्ध कामात यश मिळेल. मात्र वर्ज्य दिवस असल्याने मोठे निर्णय पुढे ढकलणे हितावह ठरेल. मानसिक स्थैर्य लाभेल.

 धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात मन रमणार आहे. ध्यान आणि साधनेतून मानसिक शांती मिळेल. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळू शकते.

 मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

 कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

 मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. मंगळ-गुरूच्या शुभ प्रभावामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यात यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. गुरूजनांचे मार्गदर्शन मिळेल.

 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या