असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, १ एप्रिल २०२६.

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, १ एप्रिल २०२६.
  • Positive News
  • एप्रिल 1 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, १ एप्रिल २०२६.

चैत्र शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. वसंत ऋतू. पराभव नाम सनावत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

"आज वृद्धी योग आहे"
आज सकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
*हनुमान जयंतीचा उपवास.* सर्व देवांना दवणा वाहणे.

चंद्र नक्षत्र - उत्तरा / (दुपारी ४.१८ नंतर) हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या (वृद्धी योग, विष्टी करण शांती)

१ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर रवि आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहेत. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आणि वृत्तीचे आहात. सतत बदल करण्याकडे ओढा असून फारकाळ एकाच गोष्टीत तुम्ही रमत नाहीत. तुम्ही उद्योग प्रिय आणि सतत कामात मग्न असतात. तुमची इतरांवर चटकन छाप पडते. वक्तृत्व उत्तम असते. कलाप्रिय आहात. मैत्रीत आणि व्यवसायात अनेक बदल होतात. इच्छाशक्तीदांडगी असून अनेक विषय चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेतात. व्यावहारिक जीवनाबरोबरच गूढ गोष्टीचे आकर्षण असते. स्वतःचे विचार इतरांवर लादण्याची वृत्ती असू शकते. जीवनातील रिद्धी आणि परंपरा तोडण्याचा स्वभाव असतो. आयुष्य चळवळीने भरलेले असते.  विचारसरणी तर्कशुद्ध असते. बोलण्यात नाजूकपणा नसतो. स्वभाव तापट आणि धाडसी असतो. विचारांशी ठाम असतात. तुम्हाला सर्व सुखे प्राप्त होतात. 

व्यवसाय:- सैनिक, राजकारण, डॉक्टर, लोखंड, इंजिनीयर, बांधकाम.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, गुरुवार.

शुभ रंग:- सोनेरी, नारंगी, जांभळा, पिवळा.

शुभ रत्ने: माणिक, पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा आधार घ्यावा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

षष्ठ स्थानी चंद्र आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नवीन ओळखी होतील. मात्र शनीच्या प्रभावामुळे काही मतभेद संभवतात. संयम ठेवा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक आवक वाढेल. महिलांकडून लाभ होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

जमीन, घर किंवा मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. अधिकारात वाढ होईल. मात्र निर्णय घेताना सावध राहा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

कलाकार, गायक, अभिनेते यांना उत्तम दिवस आहे. नवीन संधी मिळतील. काही वाद निर्माण होऊ शकतात, पण त्यात विजय मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

प्रेम आणि आनंदाचा दिवस आहे. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल. खर्च वाढू शकतो.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

तुमच्या राशीत चंद्र असल्याने व्यक्तिमत्व उजळून निघेल. मात्र शनी प्रतियुतीमुळे मानसिक ताण जाणवेल. शांतता राखा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

मन अस्वस्थ राहील. चिडचिड वाढू शकते. अध्यात्म आणि उपासना याकडे वळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

स्वतःच्या व्यक्तिमत्वावर खर्च कराल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. मात्र खर्च वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

ग्रहमान अनुकूल आहे. आनंदाचा दिवस आहे. नवीन संबंध जुळतील. कला आणि संगीत यामध्ये रस वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

आर्थिक लाभ होईल. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

अष्टम स्थानी चंद्र असला तरी नैराश्य काहीसे कमी होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

जुने व्यवहार पूर्ण करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावध राहा. गैरसमज टाळण्यासाठी संयम ठेवा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या