राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
???? आजचा विशेष दिवस
आजचा दिवस उत्तम आहे.
???? चंद्र नक्षत्र व राशी
नक्षत्र - उत्तरा / (रात्री १०.३६ नंतर) हस्त
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (व्याघात योग आहे)
२८ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही स्वतंत्र विचारांचे आणि वृत्तीच्या आहात. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाहीत. तुमच्या जीवनात बरेच चढ-उतार येतात. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडावा असं तुम्हाला मनापासून वाटत असतं. तुमचं वक्तृत्व उत्तम असल्याने तुम्ही इतरांवर छाप पाडतात. आई वडील पत्नी किंवा इतर नातेवाईक यांच्या पासून तुम्हाला लाभ होतो. नोकरीत आणि व्यवसायात तुम्हाला अधिकाराची जागा मिळते. आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुमच्यावर चंद्राचा देखील प्रभाव असतो. त्यामुळे तुम्हीच चंचल वृत्तीचे असतात. त्याचप्रमाणे तुमच्या विचारांमध्ये गांभीर्य आणि खोली असते. तुम्ही शीघ्रकोपी असतात. शैक्षणिक संस्था, सामाजिक दवाखान्याच्या संस्थांशी तुमचा संबंध येतो. तुम्हाला तुमच्या भावना सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. समाज कार्य करत असूनही तुम्हाला सामाजिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. विवाह करताना साथीदार निवडताना तुम्ही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक होऊ शकते. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असते. तुम्ही अतिसंवेदनशील आहात आणि बारीकसारीक गोष्टीनी अस्वस्थ होतात.
व्यवसाय:- सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, बँकिंग, वृत्तपत्र व्यवसाय, इंटेरियर डेकोरेटर, प्रोग्रॅम डायरेक्टर, सैनिकी जीवन, कारखानदारी, बांधकाम क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, गुरुवार.
शुभ रंग:- नारंगी.
शुभ रत्न:- माणिक, पाचू.
???? आजचा दिवस
"आजचा दिवस उत्तम असून प्रगतीकारक आहे."
???? ग्रहयोग
चंद्र त्रिकोण शुक्र
चंद्र त्रिकोण हर्षल
चंद्र प्रतियुती नेपच्यून
???? टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
???? मेष :-
कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत लाभ संभवतो.
???? वृषभ :-
सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होईल.
???? मिथुन :-
विचार स्पष्ट होतील. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. संवादातून यश मिळेल.
???? कर्क :-
घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकता. सहकार्य मिळेल.
???? सिंह :-
मान-सन्मान वाढेल. कार्यस्थळी प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
???? कन्या :-
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ.
⚖️ तुळ :-
आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
???? वृश्चिक :-
संमिश्र दिवस आहे. गुप्त बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. संयमाने निर्णय घ्या.
???? धनु :-
मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक उलाढाल वाढेल.
???? मकर :-
कामात व्यस्त राहाल. जबाबदाऱ्या वाढतील. मेहनतीचे फळ मिळेल.
???? कुंभ :-
दिवस चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. मानसिक समाधान मिळेल.
???? मीन :-
खर्च वाढू शकतो. ध्यान, जप केल्यास मानसिक शांतता लाभेल.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
???? 8087520521