असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, १९ मे २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, १९ मे २०२६
  • Positive News
  • मे 19 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, १९ मे २०२६

अधिक ज्येष्ठ शुक्ल तृतीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज चांगला दिवस आहे."
विनायकी चतुर्थी

 चंद्रनक्षत्र - मृग / (सकाळी ८.४२ नंतर) आर्द्रा.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन. (धृती योग शांती)

 चंद्र लाभ मंगळ.
 चंद्र युती शुक्र.
 चंद्र केंद्र शनी.
 चंद्र केंद्र नेपच्यून.
 बुध लाभ नेपच्यून.
 शुक्र लाभ मंगळ.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ वाढतील. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायक वेळ व्यतीत कराल. चंद्र शुक्र युतीमुळे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला दिवस आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यवसायात वाढ होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन खरेदीचा योग आहे. शुक्र आणि मंगळाच्या शुभ योगामुळे मनातील इच्छा पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत वेळ चांगला जाईल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. मन आनंदी राहील. बुध लाभ नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल. लेखक, कलाकार आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढू शकतो. मात्र शुभ ग्रहयोगामुळे काही मनासारखी कामे पूर्ण होतील. दानधर्म करण्याची इच्छा होईल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात आनंददायक घडामोडी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) दशम स्थानी चंद्र आहे. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. महिलांकडून सहकार्य लाभेल. कामातील जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून लाभही होतील. प्रतिष्ठा वाढेल.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवम स्थानी चंद्र आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. भाग्याची साथ लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) अष्टम स्थानी चंद्र आहे. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्च संभवतो. मात्र गूढ विषय, संशोधन आणि तांत्रिक कामात यश मिळेल. वादविवाद टाळावेत.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो. प्रिय व्यक्तीसोबत वेळ चांगला जाईल. काही गैरसमज दूर होतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. महिलांकडून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) पंचम स्थानी चंद्र शुक्र युती अत्यंत शुभ आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात यश लाभेल. शेअर्स आणि गुंतवणुकीतून लाभ संभवतो. कला आणि सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रगती होईल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरण आनंददायक राहील. वास्तू आणि वाहनसुख लाभेल. आईच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. घरातील काही महत्त्वाचे निर्णय आज घेतले जातील.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या