असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, १३ जानेवारी २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, १३ जानेवारी २०२६
  • Positive News
  • जानेवारी 13 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य मंगळवार, १३ जानेवारी २०२६
 पौष कृष्ण नवमी
 शके १९४७ | संवत २०८२
 हेमंत ऋतू | उत्तरायण
 धनुर्मास समाप्ती – आज भोगी
 विश्वावसुनाम संवत्सर

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

 राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

आज विशाखा नक्षत्र – वर्ज्य दिवस आहे.
शूल योग, विष्टी करण असल्यामुळे महत्त्वाची नवीन कामे टाळावीत.
धार्मिक, पारंपरिक व घरगुती तयारीसाठी योग्य दिवस.

 चंद्रनक्षत्र – विशाखा
 आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ / वृश्चिक 

 रवी लाभ चंद्र – प्रतिष्ठा, मान-सन्मान
 चंद्र लाभ मंगळ – ऊर्जा, कार्यक्षमता
 चंद्र त्रिकोण गुरू – मार्गदर्शन, शुभ निर्णय
 चंद्र लाभ शुक्र – सुख, सौंदर्य, नाती
 चंद्र त्रिकोण शनी – स्थैर्य, संयम
 चंद्र प्रतियुती हर्षल – अचानक बदल, नवे विचार

 मेष

(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज उत्साह आणि कामाची गती चांगली राहील. अचानक निर्णय टाळावेत. वरिष्ठांशी संयमाने वागा.

 वृषभ

(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक. घरातील ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.

 मिथुन

(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
आज मन अस्थिर राहू शकते. लेखन, अभ्यास, चिंतनासाठी चांगला दिवस. वाद टाळा.

 कर्क

(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. खर्चाचे नियोजन आवश्यक. आईकडून सहकार्य मिळेल.

 सिंह

(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
प्रतिष्ठा वाढेल. कामात यश मिळेल; मात्र अहंकार टाळावा. आरोग्य ठीक राहील.

 कन्या

(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नोकरी-व्यवसायात स्थैर्य येईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नियम पाळा.

 तूळ

(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आज निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. मानसिक ताण जाणवू शकतो. ध्यान उपयुक्त ठरेल.

 वृश्चिक

(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
मित्रांकडून मदत मिळेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता. संयम आवश्यक.

 धनु

(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, धार्मिक विषय अनुकूल. प्रवास टाळावा.

 मकर

(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा ताण वाढेल. जबाबदाऱ्या पार पाडताना आरोग्याकडे लक्ष द्या.

 कुंभ

(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
अचानक बदल संभवतात. खर्च वाढू शकतो. गोपनीयता जपा.

 मीन

(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक समाधान मिळेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मन प्रसन्न राहील.

 शुभ रंग: निळा, पांढरा
 शुभ अंक: ३, ६, ९

— सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 कुंडली परीक्षण, व्यवसाय, विवाह, भाग्य, आरोग्य, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प शुल्कात जाणून घेण्यासाठी संपर्क करा – 8087520521

संबंधित बातम्या