पौष कृष्ण षष्ठी
विश्वावसु नाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८२
चंद्रनक्षत्र – पूर्वा फाल्गुनी / (सायं. नंतर) उत्तरा फाल्गुनी
चंद्रराशी – सिंह / (सायं. नंतर) कन्या
हेमंत ऋतू – उत्तरायण
राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
आज चांगला दिवस आहे.
ग्रहयोग :
चंद्र त्रिकोण मंगळ – साहस, ऊर्जा, निर्णयक्षमता व आत्मविश्वास वाढवणारा योग
चंद्र लाभ गुरू – प्रगती, लाभ, मार्गदर्शन व शुभ संधी देणारा योग
चंद्र प्रतियुती शनी – जबाबदारी, शिस्त व संयम आवश्यक; कष्टाने यश
चंद्र त्रिकोण हर्षल – नवीन कल्पना, अचानक संधी व बदलांस अनुकूलता
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह / कन्या
मेष
आज उत्साहपूर्ण दिवस. कामात गती येईल. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील.
वृषभ
आर्थिक लाभाचे संकेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात समाधान राहील.
मिथुन
नवीन कल्पना सुचतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवहारात सावधगिरी ठेवा.
कर्क
गुरुकृपेने मार्गदर्शन मिळेल. शिक्षण, सल्ला व अध्यात्मासाठी अनुकूल दिवस.
सिंह
चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास व नेतृत्वगुण वाढतील. मान-सन्मान प्राप्त होईल.
कन्या
सायंनंतर चंद्र प्रवेश लाभदायक. कामातील अडथळे दूर होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ
सामाजिक संपर्क वाढतील. आर्थिक व्यवहारात लाभ संभवतो. सहकार्य मिळेल.
वृश्चिक
संयम आवश्यक. जबाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल.
धनु
प्रवास, नवीन ओळखी व ज्ञानवृद्धीचे योग. सकारात्मक बदल जाणवतील.
मकर
कार्यक्षेत्रात स्थैर्य येईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
कुंभ
नवीन तंत्रज्ञान, कल्पना व प्रयोगांसाठी उत्तम दिवस. मित्रमंडळींचा लाभ.
मीन
मानसिक समाधान मिळेल. कला, संगीत व अध्यात्माकडे ओढ वाढेल.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क – 8087520521